Halloween party ideas 2015


कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या खाती पाच लाख धावा
बाराव्या शतकात इंग्लंडमध्ये जन्मलेले क्रिकेट इंग्रजांनी त्यांचे राज्य असलेल्या प्रत्येक देशात नेले. परंतु पहिली अधिकृत कसोटी व्हायला १९ वे शतक उजाडावे लागले. जगातली पहिली कसोटी इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान १५ ते १९ मार्च १८७७ या कालावधीत मेलबोर्न येथे खेळविण्यात आली. कसोटी क्रिकेट इतिहासातील पहीली नाणेेफेक ऑस्ट्रेलियाने जिंकली. कसोटीतील पहिली धाव ऑस्ट्रेलियाच्या चार्ल्स बॅनरमनने काढली. १४३ वर्षांचा इतिहास असलेल्या कसोटी क्रिकेटमध्ये सध्या आयसीसीचे बारा देश पूर्ण सदस्यत्व प्राप्त असून त्यांनाच कसोटीचा दर्जा आहे. तर आयसीसीचा विश्व एकादश संघही एक कसोटी खेळला आहे. आतापर्यंत कसोटी क्रिकेटच्या इतिहासात चार हजार सातशे अठ्ठाविस कसोटयात एकूण तेवीस लाख अठ्ठावण हजार १५७ इतक्या धावा निघाल्या आहेत.
इंग्लंडसाठी पाच लाखावी त्यांचा कर्णधार ज्यो रूटने दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या चौथ्या कसोटीत काढली. इंग्लंड सर्वाधिक १०२२ कसोटी खेळले असून त्यांनी त्यामध्ये सर्वाधिक पाच लाख सहा धावा जमविल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरील ऑस्ट्रेलियाने ८३० कसोटयात ४ लाख ३२ हजार ७०६ धावा काढल्या आहेत. त्यानतर तिसरा नंबर भारताचा येतो. भारताने ५४० कसोटयात २ लाख ७३ हजार ५१८ धावा आपल्या खाती नोंदविल्या आहेत. चौथ्या क्रमावरील विंडीजने ५४५ कसोटयात २ लाख ७० हजार ४४१ धावा फटकावल्या आहेत. द. आफ्रिका या क्रमवारीत पाचव्या स्थानी असून २ लाख १६ हजार ४५२ धावांसाठी ते ४३९ कसोटी खेळले. सहाव्या क्रमांकावर पाकिस्तान आहे. ४२७ कसोटयात ते २ लाख ९ हजार ८६९ धावा जमवू शकले. सातव्या स्थानावरील न्यूझिलंडने ४४० कसोटयात २ लाख ४ हजार १७२ धावा काढल्यात. आठवा नंबर श्रीलंकेने पटकाविला असून १ लाख ४५ हजार २१८ धावा त्यांनी २८८ कसोटयात काढल्या.११७ कसोटयात ५३ हजार ११७ धावा काढून बांगलादेश नवव्या क्रमावर आहेत. दहावा नंबर १०८ कसोटया खेळून झिंबाब्वेने मिळविला. त्यांनी ४९८६९ धावा काढल्यात. अकराव्या क्रमावरील अफगाणिस्तानने ४ कसोटयात १ हजार ५८४ धावा काढल्या. बाराव्या स्थानावरील आयर्लंडने ३ कसोटयात ११७४ फटकविल्या आहेत, विश्व एकादश संघाने १ कसोटी खेळून आपल्या खाती ३३४ धावा नोंदविल्या आहेत.
या धावा बनविताना प्रत्येक संघाची प्रती कसोटी धावा बनविण्याची सरासरी खालील प्रमाणे : - ऑस्ट्रेलिया ५२१,, भारत ५०६, श्रीलंका ५०४, विंडीज ४९६, द. आफ्रिका ४९३, पाकिस्तान ४९१, इंग्लंड ४९१, न्यूझिलंड ४६४, झिंबाब्वे ४६२, बांग्लादेश ४५४ अफगाणिस्तान ३९६, आयर्लंड ३९१ व विश्व एकादश ३३४ धावा.
          क्रिकेटमध्ये एक एक धाव मोलाची असते. मग ते वनडे, टि-२० असो किंवा कसोटी. अशा लाख मोलाच्या धावा बघण्यासाठीच प्रेक्षक आपला अनमोल वेळ व पैसा खर्च करून सामने बघायला जातात.
लेखक : -
दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल
 प्रतिनिधी भारत.
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.