Halloween party ideas 2015


जिच्या हाती पाळण्याची दोरी ! ती जगाला उध्दारी ! ! - तहसीलदार प्रियांका आयरे

बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) माणगाव तालुक्यातील एकात्मिक बालविकास अंतर्गत बेटी बचाओ बेटी पढाओ या कार्यक्रमाअंतर्गत माणगाव तहसीलदार प्रियांका आयरे यांनी उपस्थित अंगणवाडी सेविका व आशाताई यांना मार्गदर्शन करताना "जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उध्दारी या प्रेरणादायी उक्तीने संबोधित केले. सदरचा कार्यक्रम माणगाव कुणबी भवन येथे २४ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळेस माणगाव तहसीलदार यांनी अंगणवाडी सेविका यांना सांगितले कि , मुलांना सुद्धा मुलींसारखे घरातील कामामध्ये सहभागी करून विशेष करून मुलांना समानतेचं शिक्षण दिलं पाहिजे मुलींना समाजाने सुद्धा सुरक्षितता दिली पाहिजे. महिलांनीच निर्भय समाज घडवायचा आहे. तसेच अंगणवाडी सेविका यांना प्रत्येक गावातील घराघरातील कुटुंबाची माहिती जास्त प्रमाणात असते.
या कार्यक्रमासाठी माणगाव उपविभागीय अधिकारी प्रशाली दिघावकर , माणगाव तहसीलदार प्रियांका आयरे , माणगाव उपसभापती राजेश पानावकर, माजी सभापती सुजित शिंदे , गटविकास अधिकारी सतीश गाढवे ,डॉ. परदेशी , बालविकास प्रकल्प अधिकारी सीमा ठाकरे तसेच तालुक्यातील अंगणवाडी सेविका , महिला सरपंच बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमावेळेस साई बीटाकडून बेटी बचाओ , बेटी पढाओ या बाबत पथनाट्यातून रोलप्ले सादर केला. यावेळेस प्रांत अधिकारी प्रशाली दिघावकर यांनी संबोधित करताना सांगितले कि, आपल्या गावातील घरातील मुलींशी मनमोकळे पणाने संवाद साधला पाहिजे. तसेच खाजगी , सरकारी शाळेतील मुलींना स्वतःचे संरक्षण कसे करायचे याबाबत सर्व गावातील महिलांनी पुढाकार घेऊन जागृती केली पाहिजे. मुलींमध्ये असणारा निरागसपणा घालवला पाहिजे.निवडणुकीदरम्यान अंगणवाडी सेविका शिक्षकांपेक्षा जास्त काम करीत असतात याची सुद्धा त्यांनी या कार्यक्रमादरम्यान आठवण करून दिली.
माणगाव पंचायत समितीचे माजी सभापती सुजित शिंदे यांनी सांगितले कि, बेटी जन्माला आली नसती तर आम्ही जन्मलो नसतो ज्या मातेने आम्हाला जन्म दिला ती माता कोणाची तरी मुलगीच होती अशा मातेकडून आम्हाला जन्म मिळाल्यामुळे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचे अधिकार , हक्क महिलांना मिळवून दिले त्यामुळे महिलांचे सक्षमीकरण होत आहे. परंतु शासकीय कार्यालयामध्ये ९० % महिलांचा सहभाग पाहायला मिळत आहे.
यावेळेस माणगाव पंचायत समितीचे उपसभापती राजेश पानवकर यांनी सांगितले कि ,अंगणवाडी सेविका या लहान मुलांना पहिल्यापासून लहान वयातच घडवत असतात व तेथूनच मुलांच्या खऱ्या आयुष्याला सुरुवात होते. अंगणवाडी सेविकांना अनेक शासकीय कामामध्ये शासन सहभागी करून घेत असतो. अंगणवाडी सेविकांना ड्रेस कोड असल्यामुळे त्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमामध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षिका , अंगणवाडी सेविका , आशाताई तसेच ज्या महिलांनी एका मुलीनंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केली त्यांना माणगाव तहसीलदार व माणगाव प्रांत अधिकारी व माणगाव गटविकास अधिकारी यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नप्रभा म्हात्रे यांनी केले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.