उदया अमळनेर तालुका ग्रामपंचायत कर्मचारी मेळावा---
कळमसरे ता.अमळनेर-----
महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी युनियन एन जी पी अमळनेर तालुका ग्रामपंचायत संघटनेचे तालुका पदाधिकारी यांनी अमळनेर तालुका ग्रामपंचायत कर्मचारी मेळाव्याचे आयोजन ता. 25 रोजी सकाळी 10 वाजता कालभैरवनाथ महाराज मंदिर मारवड ता.अमळनेर येथे आयोजन केले आहे.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अनिल पाटील, तर पंचायत समितीच्या सभापती रेखा पाटील,जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्री पाटील,पंचायत समितीचे उपसभापती भिकेश पाटील,सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश साळुंखे, पंचायत समितीच्या सदस्या कविता पवार, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, विस्तार अधिकारी एल डी चिंचोरे,अनिल राणे,ग्रामसेवक संघटणेचे अमळनेर तालुकाध्यक्ष संजय पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतिष पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
याप्रसंगी उपस्थितीचे आवाहन संघटनेचे तालुकाध्यक्ष के डी पाटील, उपाध्यक्ष प्रदीप प्रदीप महाजन,सचिव सुभाष पाटील,संघटक नरेंद्र पाटील व पदाधिकारी यांनी केले आहे.