Halloween party ideas 2015


अमळनेरला तंबाखू मुक्त शाळा अभियानांतर्गत मुख्यध्यपकांची कार्यशाळा उत्साहात संपन्न

अमळनेर,
शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य,सलाम मुंबई फौंडेशन, जळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व जन मानवता बहुउद्देशीय संस्था चोपडा यांचा सयूंक्त विदमाने जळगाव जिल्हा हे जागतिक स्तरावर तंबाखू मुक्त शाळेचा घोषित होण्याकरिता वाटचाल करीत आहेत त्याबाबत अमळनेर येथे सर्व मुख्यध्यपक यांची 11 निकष पुर्तते साठी कार्यशाळा माननीय विस्तार अधिकारी पी.डी.धनगर तसेच शा.पो.आ अधिक्षक बी.पी.चौधरी यांचा प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली या कार्यशाळेत मुख्य मार्गदर्शक सलाम मुंबई फौंडेशनचे जळगाव जिल्हा समन्वयक जयेश माळी यांनी 11 निकष बद्दल उपस्थित मुख्याध्यापक यांना मार्गदर्शन केले व त्यांना येणाऱ्या अडचणी चे समाधान कारक उत्तर दिले उपस्थित मुख्याध्यापक यांनी लवकरच आपला अमळनेर तालुका हे तंबाखू मुक्त शाळेचा करु अशी ग्वाही दिली सदर कार्यशाळेत जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समिती सदस्य व जन मानवता बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राज मोहम्मद खान शिकलगर व केंद्र प्रमुख अरुण मोरे,जैतपीर मंगला पाटील,वावडे युवराज चौधरी आईडी समन्वयक, किशोर पाटील विशेष शिक्षक आणि मुख्याध्यपक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी ट्रेनर भूषण महाले यांनी परिश्रम घेतले

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.