*आदर्श चौक होईल अशी रचना करा*
अमळनेर चा दगडी दरवाजा वाहतुकीस अडचण व जीवघेणा ठरला आहे, अनेक अपघात घडतात, रुग्णांना दवाखान्यात पोचण्यास विलंब झाल्याने अनेकांचे आरोग्य नियंत्रना बाहेर गेल्याच्या घटना घडल्या आहेत,
असेही ऐतिहासिक वारसा म्हणजे काय? अभ्यासक व मोजके लोक वगळता कुणाला हा वारसा माहीत आहे
परंतु अगदीच जतन करायचा असेल तर या दगडी दरवाजाची dickto प्रतिकृती उभी करून हा चौक सुशोभित करता येऊ शकतो.. विशेष म्हणजे 100 सव्वाशे कोटी रुपयांची गरज पडणार नाही किंवा तेव्हडा निधी खरेच वापरला तर अत्यंत सुंदर व राष्ट्रीय दर्जाचा चौक निर्माण होऊ शकतो.
त्या मुळे शहराच्या सौंदर्यात भर पडून सर्व प्रश्नांची देखील उकल निघेल, केवळ विरोधाला विरोध करू नये व नवे मुद्दे आणून विकासाला बाधा आणू नये अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते धनंजय सोनार यांनी केली आहे.
या साठी आराखडा द्यायची देखील तयारी असल्याचे धनंजय सोनार यांनी ठाम पणे सांगत 27 जानेवारी रोजी संबंधित सर्व लोक प्रतिनिधी व अधिकारी वर्गास भेटून ते बाजू मांडणार आहेत,
मोठी वर्दळ असलेला ह्या रस्त्यावर नवनिर्माण करावे जनतेने या साठी पुढाकार घ्यावा अशी कळकळीची विनंती देखील त्यांनी केली आहे