लग्नापूर्वीच पितृत्व लाभलेले क्रिकेटपटू
लग्न हे भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र धर्मकार्य मानलं जातं. लग्नापूर्वी स्त्री पुरुष लैंगिक संबंध भारतीय संस्कृतीत व्याभीचार या प्रकारात मोडले जाते. तसे बघाल तर दोन अविवाहीत स्त्री पुरुषांमध्ये प्रेम प्रकरणं सर्वत्र सर्रास चालतात, अगदी भारतातही. परंतु लग्नापूर्वीच मुलबाळ होणं भारतात तरी पाप मानले जाते. त्यामुळे कितीही उडानटप्पू असलेला भारतीय या चुकीच्या फंदात पडत नाही. परंतु पाश्चात देशात व पाश्चात संस्कृतीचा अंगीकार केलेल्या इतर देशातील लोकांनी या अभद्र संस्कृतीला मोठया प्रमाणावर खतपाणी घातले आहे. त्यामुळे "लिव्ह इन " संस्कृतीत अशा प्रेमवीर जोड्या एकत्र राहून "मुल" जन्माला घालतात. काही प्रामाणिक लोक खऱ्या प्रेमामुळे पुढे त्या स्त्रीशी विवाह करून संसार थाटतात. तर काही जण "चैन " करून सदर स्त्रीला सोडून देतात. हा निव्वळ धोका आहे. परंतु काही क्रिकेटपटू असे आहेत की त्यांनी अविवाहीत असताना स्त्रीशी संबंध ठेवले. मुलही होऊ दिले व त्या स्त्रीशी लग्नही केले. तर काहींनी स्पष्ट नकारही दिला. सन १९८० ते ९० च्या दशकात विंडीजचा सुपरस्टार क्रिकेटपटू की, जो " किंग रिचर्डस " या नावाने ओळखला जायचा. त्याच्या संमिश्र फलंदाजीमुळे त्याने स्वतःचे अनेक चाहते निर्माण केले. आपल्या बहारदार खेळाने अनेक विक्रम स्थापित केले. विंडिजला दोन वेळा विश्वविजेते बनविले. इतकेच नाही तर विंडीज क्रिकेटचा सर्वत्र दरारा निर्माण करण्यात अग्रेसरही होता. टिपीकल विंडीज लुक असलेला विव्हीयन रिचर्डस आपल्या आकर्षक शैलीमुळे सर्वांच्या गळ्यातील तावीत बनला होता. सन १९८० मध्ये भारत दौऱ्यावर असताना प्रसिद्ध बॉलीवूड सिनेतारका नीना गुप्ताशी त्याची भेट झाली. या ओळखीचे प्रेमात व प्रेमाचे एकत्र राहण्यात (ज्याला " लिव्ह इन " हे गोंडस नाव आहे ) सुरुवात झाली. त्यांच्या याच विवाहबाहय संबंधातून मसाबा नावाची मुलगी झाली.आजच्या घडीला हिच मसाबा रिचर्डस बॉलीवुड मधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. रिचर्डसचं पुर्वी लग्न झालेले होते.पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुलेही आहेत. आपलं राजबिंडं व्यक्तिमत्व, अष्टपैलू, भारदस्त राहणीमान व सर्वांना आकर्षित करणारं नेतृत्व या मुळे पाकचा विद्यमान पंतप्रधान इम्रान खान नियाझी सर्वत्र परिचीत होता. याच बरोबर त्याचा ऐषोआरामी व रंगीला स्वभाव सर्वांच्या नजरेत भरायचा. आपल्या आयुष्यात विश्वविजयी कर्णधार ते एका देशाचा पंतप्रधान या सर्वोच्य पदापर्यंत पोहोचणारा इम्रान मात्र त्याच्या वैवाहिक जिवनात कधीही यशस्वी झाला नाही. तीन अधिकृत लग्न केली ते शेवटपर्यंत टिकले नाही.जेमीमा गोल्ड स्मिथ या ब्रिटीश महिलेशी पहिले लग्न करण्यापूर्वी सिता व्हाईट या ब्रिटीश ललनेशी त्याचे मैत्रीचे संबंध होते. सन १९८७ - ८८ मध्ये त्यांची प्रथम भेट झाली. १९९१ मध्ये त्यांची जवळीक आली. १९९२ मध्ये त्यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांतून मुलीचा जन्म झाला. तायरीयन हे त्या मुलीचं नाव ठेवण्यात आलं. इमरानने त्या मुलीला स्वतःचं नाव दिलं नाही. परंतु सिताचा मृत्यू व वैद्यकीय चाचण्यांमध्ये तायरीयन इम्रानचीच संतान असल्याचं सिद्ध झाल्याने त्याला तिचा सांभाळ भाग पडलं.
बॉल टॅम्परींग प्रकरणात सजा भोगून संघात परतलेला माजी ऑस्ट्रेलियन उपकर्णधार डेव्हीड वॉर्नर आपल्या खेळाचा खेळ करण्याच्या वृत्तीने सर्वत्र परिचित आहे. सन २०१४ मध्ये पाश्चात संस्कृतीत प्रचलीत असलेल्या लिव्ह इन पद्धतीनुसार आपली गर्लफ्रेंड कँडीस फॅल्जन हिला वॉर्नरच्या माध्यमातून मुलगी झाली. तिचे आयवी मे असे नामकरण करण्यात आले. पुढे चालून सन २०१५ मध्ये दोघे रितसर विवाहबध्द झाले. त्यानंतर त्यांना आणखी एक मुलगी झाली. तिचे नाव इंडी रे असे ठेवण्यात आले.
आपल्या आक्रमक व रंगील्या स्वभावाचा धडाकेबाज कॅरेबीयन फलंदाज ख्रिस गेलही या अनोख्या क्लबमध्ये समाविष्ठ आहे. सन २०१६ च्या आयपीएल स्पर्धेदरम्यान विंडीजमध्ये त्याची मैत्रीण नताशा बॅरीज हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. ही स्पर्धा सुरू असताना गेल विंडीजला जाऊन परत खेळायला आला. ब्लश हे मुलीला नाव त्यानेच दिले. सन २०१४ मध्ये मैत्री सुरू झालेल्या कॅरी कोटरेल हिच्या सोबतच्या प्रेम प्रकरणातून इंग्लंडचा विद्यमान कसोटी कर्णधार ज्यो रुट ही लग्नापूर्वीच पिता बनला.मार्च २०१६ मध्ये दोघांनी साखरपुडाही केला सन २०१७ मध्ये त्याने मुल झाल्यानंतर कॅटरोलशी विवाह केला.
अस्सल प्रेम व प्रामाणिकपणा माणूस कुठल्याही क्षेत्रातला असला तरी त्याला समाजात वेगळे स्थान निर्माण करून देतो. वरील प्रकरणात एखादा अपवाद सोडल्यास सर्वांनी आपल्या लौकीकाला जपत साथ देणाऱ्याला निराश न करता जीवनसंगीनी बनविले.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.