अमळनेर प्रतिनिधी
दि.20/12/2019
रोजी अमळगाव केंद्राचे शिक्षण संवाद परिषद दोधवद, कलाली व दोधवद माध्यमिक यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प. शाळा गांधली येथे संपन्न झाली. यावेळी अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख.आबासो श्री. गोकूळ पाटील होते. नियोजनानुसार प्रतिमा पूजन करून ईशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमास सुरुवात झाली. तद्नंतर १० मिनीटे आनापान कार्यक्रम सर्व केंद्रातील शिक्षकांनी केला .केंद्रप्रमूख यांनी मौनधारण करण्याचे ९ फायदे सांगितले . गांधली शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट परिपाठ सादर केला तसेच संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्ताने नाटिका सादर केली. श्रीमती महानंदा सूर्यवंशी मॅडम यांनी ज्ञानरचनावादवर भूगोल पाठ सादर केला. विदयार्थी सहभाग उत्कृष्ट वाटला विद्यार्थी शिक्षक अंतरक्रिया फारच छान झाली अध्ययन-अध्यापन तंत्रज्ञानावर चंद्रकांत देसले यांनी माहिती दिली. अध्यापनातील विषयातील कृप्त्या सांगितल्या
शिष्यवृत्ती परीक्षेवर सतीश पाटील यांनी फारच छान उदाहरणासह मार्गदर्शन केले. इंग्रजी साहित्य पेटीवर श्री मगन चौधरी सर यांनी माहिती दिली.यानंतर केंद्रप्रमुख श्री गोकुळ पाटील यांनी प्रशासकिय विषयात माहे डिसेंबरमधील परिपत्रक वाचन,udise तसेच शाळा सिद्धि , शिक्षण परिषद , प्रशिक्षण , कार्यशाळा पूर्ण वेळ थांबून आनंदाने , सत्कारात्मक इच्छाशक्तीने घ्यावे , आपली शाळा भरणे , मधली सुट्टी शाळा सुटण्याची वेळ परिपत्रकानुसारच करावी गावातील तक्रार येणार नाही याची काळजी केंद्रातील सर्व शिक्षकांनी घ्यावी , सर्व समित्या व शालेय रेकॉर्ड आदययावत असावे , परिपत्रकानुसार दिवस , जयंती पुण्यतिथी , सप्ताह , पंधरवाडा साजरे करावेत फोटो अहवाल VDO सांगितल्यानुसार दयावेत प्रोसिडिंगमध्ये नोंद घ्यावी फोटोचा अल्बम करुन मुख्याध्यापकांच्या टेबलावर एका दृष्टिक्षेपात शाळा व अल्बम ठेवावा . अध्ययनस्तरानुसार गट पाडून विदयार्थी केंद्रित ज्ञानरचनावादावर शैक्षणिक साहित्य वापरून आनंददायी गुणवत्तापूर्ण दर्जेदार अध्यापन करून ३१ डिसेंबर पर्यत प्रत्येक इयत्ताच्या क्षमतापूर्ण करून १०० % विद्यार्थी प्रगत करणे .आपल्या केंद्रातील सर्वच शाळा कमी अधिक प्रमाणात उत्कृष्ट आहेत त्याची यशोगाथा तयार करून त्वरीत दया . अध्यक्ष चषक क्रिडा स्पर्धा शाळेवर घेवून परिपत्रकानुसार गटानुसार यादी केंद्रस्तरावर स्पर्धासाठी सोमवारी यादी देणे .१०० % विदयार्थी उपस्थितीसाठी व विदयार्थ्याच्या सुप्तगुणाच्या विकासासाठी शाळा स्तरावर बाल आनंदमेळावा , सांस्कृतिक कार्यक्रम , पालक भेटी , श्लोक , आनापान , प्रेरणासभा घेवून लोकसहभाग मिळवून शैक्षणिक भौतीक सुविधा करणे १०० % वर्ग डिजिटल करणे, माता पालक मेळावा , हळदीकुंकू कार्यक्रम आयोजन करावे . शगुन शाळेचा उपयोग करणे , सर्व शासनाकडून मिळालेल्या चारही शैक्षणिक साहित्य पेट्यांचा उपयोग अध्यापनात उपयोग करावा प्रत्येक शाळेत इंग्रजी विषयाचे अध्यापन प्रभावीपणे वर्गात करावे . सर्व शाळांनी स्थलांतर रोखणे शाळाबाह्य सर्दैक्षण करून शाळाबाहय विदयार्थी वयानुरूप दाखल करणे एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये राहिल्यास त्या गावातील शाळेतील मुख्याध्यापक व उपशिक्षक जबाबदार राहतील १०० % विदयार्थ्याचे आधारकार्ड व राष्ट्रीयकृत बॅकेचे खाते काढणे सर्व लाभाच्या योजनेपासून एकही विदयार्थी वंचित रहाणार नाही तसेच स्कॉलरशिप ५वी ८वी च्या विदयार्थ्याचे नियोजन करून तासिका सर्वानी वाटून घेणे व विदयार्थी मेरिटला कसे येतील यासाठी प्रयत्न करावे . प्रत्येक वर्गशिक्षकांनी आपला विदयार्थी व शाळा बोलकी करावी वर्गात कविता , ऱ्हाईम ,पाढे , प्रकल्प , संवाद , मुलाखत , श्लोक , स्वाध्याय , गाणी , नितीमूल्यावर गोष्टी , प्रयोग , स्वयंअध्ययन , वाचन लेखन प्रकल्प , गणिती चारही क्रिया यांचा गट व वैयक्तिक मार्गदर्शन करून तयारी करणे प्रत्येक वर्गशिक्षकांनी धूळपाटी , ज्ञानकूंभ , oते १०० दोन अंक संच प्रत्येकाच्या वर्गात असावे इ मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री गोकुळ साळुंखे, जितेंद्र शेटे, गुलाब शिरसाठ, नीता बडगुजर, दोधवद माध्यमिक व गांधली शाळेचे विशेष सहकार्य लाभले.श्री प्रेमराज पवार यांनी सूत्रसंचालन केले तर रवींद्र चव्हाण यांनी आभार मानले.
