Halloween party ideas 2015


'आदर्श परिपाठ' सादरीकरण
धरणगाव-( दि-२१)  आदर्श माध्यमिक विद्यालय धरणगाव येथील इयत्ता सातवी च्या विद्यार्थिनी नि आदर्श परिपाठ साजरा केला 

        शनिवार दि २१ डिसेंबर रोजी वर्गशिक्षक किरण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श विद्यालयाच्या इयत्ता ७वी च्या चिमुकल्या बलिकांनी सुंदर 'आदर्श परिपाठ' साजरा केला

      "संस्कार शाळा आहे ज्ञानाची लाट
        "येथूनच मिळते शिकण्याची वाट
        "अशा या सुंदर शाळेत नेहमीच सादर होतो परिपाठ"
     परिपाठच्या सुरुवातीच्या या सुंदर ओळींनी उपस्थित विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा गजर करुन परिपाठला दाद दिली 
      
      राष्ट्रगीतापासून परिपाठाची सुरुवात झाली, प्रतिज्ञा, प्रार्थना, संविधान वाचन ह्या चार प्रमुख सदर विद्यार्थांनी सामूहिक रित्या सादर केले
        पंचांग,सुविचार, म्हणी, दिनविशेष, बातम्या, वाढदिवस, समूहगीत, प्रश्नमंजुषा, व्यक्तिविशेष, चिंतन, बोधकथा, श्लोक, दोहे, काव्यगायन, पाढे, ओमकार मौन हे परिपाठा तील सदरे विद्यार्थिनी नी आत्मविश्वासाने सादर केलीत
     
        रोहिणी माळी, कोमल माळी, लक्ष्मी पाटील, स्वाती पाटील, भाग्यश्री पाटील या मुलींनी अप्रतिम सदर सादर केलेत तर
        भावना भदाणे या विद्यार्थीनीने सुंदर सूत्रसंचालन केले
        या सुंदर उपक्रमाचे मुख्याध्यापकानी तोंडभरून कौतुक केले आहे*
         परिपाठ यशस्वी करण्यासाठी वैशाली बाविस्कर, पी ए पाटील, मुकेश तोरवणे, बाबाजी मासुळ, फिलीप गावीत, तुषार नाईक, प्रवीण पाटील यांनी सहकार्य केले
           या सुंदर उपक्रमाचे मुलींचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष सी के पाटील, सचिव-सौ सुरेखा पाटील, यांनी केले आहेत तशेच शिक्षकांचे अभिनंदन केले आहे

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.