आज धुळे येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने वाढती महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांवर कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुसकानास त्वरित अनुदान जाहीर करण्यासंदर्भात भाजप सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करून मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले यावेळी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आ.डॉ. सुधीर तांबे, आ.कुणालबाबा पाटील माजी मंत्री मा. शोभाताई बच्छाव, धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मा.शामभाऊ सनेर, धुळे शहर काँग्रेसचे अध्यक्ष मा.युवराजआबा करंकाळ मा.दरबारसिंग गिरासे, तसेच धुळे जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी, बीजेपी सरकार हे निष्क्रिय सरकार आहे राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुसकान झालेले आहे परंतु शासनाला त्याच्याशी काहीही घेणे-देने नाही याबाबत शासनाने त्वरित हेक्टरी रु.25000 मदत जाहीर करावी तसेच देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झालेली आहे, महागाई प्रचंड वाढलेली आहे, नोटबंदी आणि जीएसटी मुळे अनेक उद्योग बंद झाल्यामुळे वाढलेली बेरोजगारी, बँकिंग अर्थ व्यवस्था कोलमडून गेल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज पुरवठ्यासाठी येत असलेल्या अडचणी या सर्व गोष्टींवर मार्ग काढण्यात या सरकारला पूर्ण अपयश आले आहे, हे सरकार सर्व सामान्य गरीब जनतेची फसवणूक करत आहे परंतू जनता या सरकारला त्याच्या नाकर्तेपणाचा जाब विचारल्या शिवाय राहणार नाही असे आ. डॉ.तांबे यांनी सांगितले
