पारोळा तालुका छावा संघटनेकडुन गट शिक्षणाधिकारी श्रीमती कविता सुर्वे यांचा सत्कार व अभिनंदन .
पारोळा प्रतिनिधी
पंचायत समिती पारोळाच्या गट शिक्षणाधिकारी पदी ताईसाहेब श्रीमती कविता सुर्वे यांची जिल्हा परिषद जळगाव यांनी नुकतीच निवड केली म्हणुन पारोळा तालुका छावा संघटनेचे पदाधिकारी तालुकाध्यक्ष विजय पुना पाटील, प्रताप पाटील, विनोद पाटील,ईश्वर पाटील, अविनाश पाटील, सुनिल पाटील यांनी सहर्ष सत्कार व अभिनंदन केले . यावेळी विजय पाटील म्हणाले की श्रीमती कविता सुर्वे मॅडम ह्या पारोळा तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात गेल्या आठ वर्षापासुन अतिशय छान व गुणवत्तापुर्ण शिक्षणासाठी कार्य करीत असुन तामसवाडी बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी म्हणुन त्यांनी आपल्या उत्कृष्ट कार्याचा ठसा उमटविला आहे . तालुक्याभरातील सर्वच शिक्षक, शिक्षक संघटना व सामाजिक संघटना त्यांच्या कार्याने व कार्यतत्परतेने प्रभावित आहेत म्हणुनच छावा संघटनेलाही त्यांच्या कार्याचे व व्यक्तीमत्वाचे कौतुक व अभिमान आहे . त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी आज आम्ही कार्यालयात येवुन त्यांचे अभिनंदन व सत्कार करतांना आम्हाला आनंद वाटला . त्यांच्या प्रत्येक चांगल्या कार्यात व उपक्रमात छावा संघटना त्यांच्या पाठीशी राहिल .
श्रीमती कविता सुर्वे यांनीही फक्त तालुक्याच्या शैक्षणिक व गुणवत्ता विकास व शिक्षकांच्या समस्या अडीअडचणी तात्काळ सोडविण्यास व सर्व घटकांमध्ये योग्य समन्वय साधुन शैक्षणिक लौकिक वाढविण्याचा व दाखलपात्र सर्वच विदयार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणुन सर्व शासकिय योजनांचा लाभ त्यांना मिळवुन देण्याचा माझा अविरत प्रयत्न राहिल असे प्रतिपादन केले .
