Halloween party ideas 2015


स्वामी नारायण मंदीरातर्फे भक्तिमय वातावरणात 150 संतांचे पुष्पवृष्टीद्वारे स्वागत

स्वामी नारायण, स्वामी नारायण गजराने अमळनेर नगरी दुमदमली

अमळनेर प्रतिनिधी- विश्ववंदनीय प्रमुख स्वामी महाराजांच्या पवित्र हस्ते प्राणप्रतिष्ठा झालेल्या खानदेशातील शिखर बद्दल स्वामीनारायण मंदिरात दिनांक 13 रोजी अकरा वाजता स्वामीनारायण संप्रदायाचे 150 संतांचे अमळनेर नगरीत आगमन झाल्यानंतर स्वामीनारायण स्वामीनारायण मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ भक्तिमय वातावरणात पुष्पवृष्टीद्वारे भक्तांनी स्वागत करून त्यानंतर स्वामीनारायण भगवंताचे घनश्याम महाराज, राधाकृष्णदेव, विठ्ठल, रुक्मिणी ,शिवपार्वती, गणपती, हनुमानजी, या मुर्तीचे दर्शन घेऊन भगवंताला साष्टांग दंडवत केले.
  त्यानंतर पूज्य योगीस्नेह, अखंड मुनिस्वामी ,परमपूज्य  बजरंगजी अग्रवाल यांनी 150 नवीन युवक संतांना मंदिर कसे बांधले मंदिराच्या पायाभरणी पासून मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत मंदिराविषयी माहिती विशद केली. त्यानंतर मंदिराच्या आवारात 150 संताना स्टेजवर मानात करण्यात येऊन प्रत्येक घरी भक्ताने फुलहार घालून त्यांचे स्वागत करून स्वामीनारायण भगवान की जय , प्रमुख स्वामी महाराज महाराज की जय महंत स्वामी महाराज की जय या घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमला होता या संतांचा दर्शनाचा व महिलांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
या संतांच्या दर्शनाला अमळनेर विभागाचे पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांनी उपस्थिती लावली हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंमळनेर सत्संग मंडळ, महिला मंडळ, युवक मंडळ , युवती मंडळ विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे नियोजन अतुल सोनी, प्रीतम मणियार, अमरीश अग्रवाल, रमेश कुंभार, जगदीश चौधरी ,चंद्रकांत  वाणी, पंकज महाजन ,अनिल पाटील, धीरज अग्रवाल, हरिकृष्ण सोनी,रोहीत बढरे, किशोर सोनी,योगेश चौधरी आदींनी विशेष मेहनत घेतली.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.