Halloween party ideas 2015



स्टार हेल्थ अन्ड आलाईड इन्सुरन्स लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांची  दिशाभुल...? पाॅलिसी रिनिव्ह करण्या साठी प्रचंड टाळा टाळ - सुबोध जाधव


    बोरघर /  माणगांव ( विश्वास गायकवाड ) राज्यात सर्वत्र अनेक छोट्या मोठ्या फायनान्शियल कंपन्या,सहकारी पतसंस्था, बैंक आणि हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा माध्यमातून सर्व सामान्य गोरगरीब जनतेच्या घामाच्या आणि कष्टाच्या पैशावर डल्ला मारून फरार होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे गोरगरीब जनतेचा अशा फसव्या कंपन्या आणि त्यांच्या भुलभूलैया लाभदायी योजनांवरील विश्वास उडत चालला असताना
 रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्याच्या इंदापूर विभागात कार्यरत असलेल्या स्टार हेल्थ अन्ड आलाईड इन्सुरन्स लिमिटेड या कंपनीचा भोंगळ कारभार सदर कंपनीचे ग्राहक सुबोध श्रीराम जाधव यांच्या माध्यमातून समोर आला आहे. 
        सुबोध जाधव म्हणतात की, मी २५ आँगस्टला फोन केला व सांगीतले की माझी हेल्थ पाॅलीसी ही २८ आक्टोबरला २०१९ संपत आहे तुम्ही त्वरित रिनिव्ह करून घ्या. परंतु मला कंपनीच्या एका कर्मचाऱ्यांने फोन घेऊन सांगीतले की तुम्ही काही काळजी करू नका रिनिव्ह तारीख संपली तरी ती मी करून घेईन.आज रिनिव्ह तारीख संपून तिन महिने झाले तरी मला स्टार हेल्थ अन्ड आलाईड इन्सुरन्स कंपनीचे काही एजन्ट फोन केल्यावर टोलवा टोलवीचे उतर देत आहे.व सांगत आहेत तुम्ही काही टेंन्शन घेऊ नका साहेब.    

       स्वतः कंपनीच स्वतः चे हेल्थ राखू शकत नाही तर ही कंपनी ग्राहकांना काय हेल्थ देऊ शकेल ? ही कंपनी सर्रास पणे ग्राहकांची वारंवार दिशाभूल करत असून. ग्राहकांची पाॅलिसी रिनिव्ह करण्यास ती जाणिव पूर्वक टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माणगाव तालुका अध्यक्ष सुबोध श्रीराम जाधव यांनी सोमवारी दि.११ नोव्हेंबर २०१९ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता आपल्या इंदापुर येथील कार्यालयात जाहीर पत्रकार परिषद घेऊन सांगीतले.               

       सुबोध जाधव यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, माझी माझ्या पत्नीची आणि माझ्या मुलांच्या व परिवाराची सदर कंपनी मध्ये हेल्थ पाॅलिसीज आहेत आज माझ्या सारख्यांची ही अशी अवस्था आज कंपनीकडून होत असेल तर सर्वसामान्य ग्राहकांना या कंपनीचा कीती त्रास सहन करावा लागत असेल  ? 
       सदर हेल्थ इंश्योरेंस कंपनी बँक आॅफ इंडियाशी सलग्न असल्याचे कंपनी कडून म्हटले जाते त्यामुळे बँक ऑफ  इंडिया कडे चौकशी केली असता असता बैंक आॅफ इंडिया सांगत आहे की आमचा आणि सदर हेल्थ इन्सुरन्स लिमिटेड कंपनीचा काहीही संबंध नाही. सदर कंपनी फ्राॅड आहे. हे समजताच सुबोध श्रीराम जाधव यांच्या पायाखालची वाळूच सरकली मोठ्या कष्टाने पै पै जमा केलेला पैसा सुबोध जाधव यांनी कुटुंबाच्या हेल्थ इन्शुरन्स च्या नावाखाली सदर हेल्थ इन्शुरन्स कंपनीत गुंतवला आहे. त्यामुळे ते सदर कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे संभ्रमित झाले आहेत. सदर हेल्थ इन्शुरन्स कंपनी ग्राहकांची राजरोसपणे फसवणूक करण्याचा अनागोंदी कारभार करत आहे. सदर हेल्थ इन्शुरन्स कंपनीची संबंधित विभागाकडून चौकशी व्हावी  असे त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगीतले.                        

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.