- भरधाव मोटरसायकलचा अपघात होऊन दोन युवक गंभीर जखमी
अमळनेर :प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील दहिवद फाट्यानजीक भरधाव मोटरसायकलचा अपघात होऊन नियंत्रण सुटल्याने त्यावरील दोन तरूण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मनिष चव्हाण (वय२२)व राकेश सोनवणे (वय २४)हे दोघे ही आपल्या मोटरसायकलने अमळनेरहून दहिवद गावाकडे जात असताना त्यांची भरधाव मोटरसायकल रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न आल्याने त्यांचे मोटरसायकल वरील नियंत्रण सुटले व वेगात असलेली मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या ड्रमला जोरदारपणे ठोकली गेली आणि मोटरसायकल वरील मनिष चव्हाण व त्यांच्यामागे बसलेले राॅकेश सोनवणे हे दोघेही गंभीर जखमी होऊन रस्त्याच्या कडेला पडलेले होते.
त्यावेळेस दहिवद गावातील आर.डी.चौधरी सेवालाल गोकुळ पाटील व कल्लू दादा यांनी तेथून जात असलेल्या रूग्णवाहिनीला थांबवून या दोघेही अपघातग्रस्तांना अमळनेर अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात पोचविले व पुढील उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. जी.एम. पाटील यांनी त्यांना धुळे येथे हलविले.