Halloween party ideas 2015



दत्ता विघावे यांना राष्ट्रीय लक्ष्यवेध पुरस्कार प्रदान

सर्वत्र अभिनंदन
अमळनेर प्रतिनिधी
 वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट ( डब्ल्यूसीपीए ) चे इंटरनॅशनल मेंबर व युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुलचे भारतीय सदस्य दत्ता विघावे यांना नुकताच राष्ट्रीय लक्ष्यवेध पुरस्कार प्राप्त झाला आहे. जेष्ठ चित्रपट अभिनेते, दिग्दर्शदक व निर्माता अरूण नलावडे यांच्या हस्ते दत्ता विघावे यांना हा पुरस्कार मिळाला.
            मुंबई येथे डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झालेल्या एका रंगारंग कार्यक्रमात सदर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. श्वास या ऑस्कर मानांकीत चित्रपटाचे निर्माते अरूण नलावडे यांच्याहस्ते शामरंजन बहुउद्देशीय फौंडेशन मुंबई व अखील भारतीय कला, क्रिडा व सांस्कृती अकेडमी ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा मानपत्र, सन्मानचिन्ह व सन्मानार्थींच्या कार्याचा परिचय असलेली स्मरणीका देऊन गौरव करण्यात आला.
            क्रिकेट पंच, प्रशिक्षक, समिक्षक, पत्रकारीता, साहित्य या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करुन देशाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या दत्ता विघावे यांना हा पुरस्कार मिळाला. याप्रसंगी अनेक गणमान्य व्यक्ती उपस्थित होत्या.
             राष्ट्रीय लक्षवेध पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल दत्ता विघावे यांचे समाजातील सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.