Halloween party ideas 2015


आजची मुले भावी भारताचे आधारस्तंभ मुख्याध्यापक अनिल महाजन

अमळनेर प्रतिनिधी- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती ही बालदिन म्हणून साजरी केली जाते .आणि त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा करण्याची इच्छा व्यक्त करण्यामागे आधुनिक अन विकसित भारताचे स्वप्न होते.कारण आजचे बालक हेच देशाचे भावी पालक- मालक होणार आहेत.म्हणून बालक हेच भावी भारताचे आधारस्तंभ आहेत. अशा बालकांना आनंदी व सुदृढ वातावरण पुरविणे हे सर्वाचे कर्तव्य आहे असे देवगांव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूल येथे १४ नोव्हेंबर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु जयंतीनिमित्त अध्यक्षीय भाषणातून शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन  यांनी आपले विचार मांडले.
व्यासपीठावर जेष्ट शिक्षक अरविंद सोनटक्के, आय.आर.महाजन, एस.के.महाजन,एच.ओ.माळी होते.जेष्ट शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेचे पुजन केले.
शाळेचे स्काऊट शिक्षक एच.ओ.माळी ,अरविंद सोनटक्के यांनी पंडित नेहरू यांच्या जीवनावर आधारित माहिती कथन केली.यावेळी विद्यार्थी व विद्यार्थ्यांनींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख आय.आर.महाजन यांनी केले. तर आभार एस.के.महाजन यांनी मानले.यावेळी शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.