*समता शिक्षक परिषद सभा संपन्न*
जग झपाट्याने बदलत असून शिक्षक देखील बदलला पाहिजे, अध्यापन पद्धती बदलली पाहीजे व 21व्या शतकाची कौशल्ये शिक्षकांनी आत्मसात केली पाहिजे, असे प्रतिपादन समता शिक्षक परिषदेचे माध्यमिक विभागाचे राज्याध्यक्ष भरत शिरसाठ योनी माध्यमिक पतपेढी, जळगांव येथे समता शिक्षक परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या संयुक्त रित्या आयोजित केलेल्या सभेत केले.
म.रा. समता शिक्षक परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची महत्त्वपुर्ण सभा नुकतीच माध्यमिक पतपेढी जळगांव येथे संपन्न झाली. प्राथमिकचे राज्याध्यक्ष सुर्यकांत गरुड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संघटनेचे माध्यमिकचे राज्याध्यक्ष भरत शिरसाठ सभेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. संघटनेचे राज्य पदाधिकारी धनराज मोतीराय, विभागीय अध्यक्ष रावसाहेब जगताप, महीला विभाग जिल्हाध्यक्षा छाया सोनवणे प्रमुख अतीथी म्हणून उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीस माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष शालीग्राम भिरुड यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाल्याने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सदर प्रसंगी 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतीराव फुले स्म्रुतीदिनानिमित्त जिल्ह्यातून 20 प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गुणवंत शिक्षक देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक महीन्याच्या एक तारखेला वेतन मिळावे व शिक्षणक्षेत्रात वाढत चाललेल्या भ्रष्टाचारा विरुद्ध एका दिवसाचे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. चालू वर्षापासून संघटनेमार्फत विद्यार्थ्यांकरीता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. 21 व्या शतकाला सामोरे जात असताना बदलत्या काळात शिक्षकाने देखील बदलावे, त्याकरीता संघटनेमार्फत नवीन अध्यापन पद्धती व तंत्रांच्या माहीतीसाठी कार्यशाळा घेतली जाणार आहे. शिक्षकांचे वेतन हे एस.बी.आय.शी संलग्न करण्याकरिता प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला
सदर प्रसंगी जळगांव जिल्हा समता शिक्षक परिषद प्राथमिक विभागाची कार्यकारीणी घोषित करण्यात आली.
नुतन कार्यकारीणी-
जिल्हाध्यक्षा-श्रीमती प्रभावती बावस्कर- आर.आर.विद्यालय, जळगांव
उपाध्यक्ष- श्री.गोविंदा वंजारी- एरंडोल
कार्याध्यक्ष- रमेश सोनवणे- जळगांव
सचिव- अजय भामरे- अमळनेर
कोषाध्यक्ष- प्रविण अहीरे- चाळीसगाव
सहसचिव- संगिता भैय्यासाहेब सोनवणे- पिंपरखेड
संघटक- सुरेश सोनवणे-चाळीसगाव
जिल्हा समता शिक्षक परिषद माध्यमिक कार्यकारीणीत विस्तार करण्यात आला. त्यात गणेश दत्तात्रय बच्छाव(म्हसावद) यांची जिल्हा सचिव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. श्रीमती अश्विनी कोळी- यावल, श्रीमती शितल जडे- पाचोरा यांची महीला आघाडी जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सदर प्रसंगी संघटनेचे राज्य पदाधिकारी धनराज मोतीराय यांनी शिक्षणाचा अर्थ नोकरी न घेता उद्योग उभारणीवर दिला पाहीजे, असे नमूद केले. जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद आठवले यांनी मनोगत व्यक्त करतांना विद्यार्थ्यांना विचारी बनवणारे शिक्षण दिले जावे, असे सांगीतले. समता शिक्षक परिषद हे निस्वार्थी शिक्षकांचेे सघटन असून बहुजन महापुरुषांच्या विचारसरणीप्रमाणे शिक्षिकांना व्यावसायिक व व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रोत्साहित करण्याचे काम करत असल्याचे आपल्या अध्यक्षिय भाषणात संघटनेचे प्राथमिक विभागाचे अध्यक्ष सुर्यकांत गरुड यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष बी. एन.पाटील यांनी व सूत्रसंचालन माध्यमिक विभागाचे सरचिटणीस रणजीत सोनवणे यांनी केले. तर आभार वाय.टी.पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी जळगाव महानगर प्रमुख टि.बी.पांढरे, जिल्हा समन्वयक राहुल पाटील, चिंतामण जाधव, प्रकाश तामस्वरे, हेमकांत लोहार, सुधाकर मोरे इत्यादींनी परिश्रम घेतले.