अमळनेर प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ मुंबई पुरस्कृत पुज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर आयोजित विभागीय खान्देशी बोली मराठी साहित्य संमेलन २३ व २४ नोव्हेंबर २०१९ रोजी पूज्य साने गुरुजी साहित्यनगरी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह अमळनेर जिल्हा जळगाव या ठिकाणी आयोजित केले आहे. नुकतीच सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात पत्रकार परीषद आयोजित करण्यात आली. त्यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, उपाध्यक्षा डॉ माधुरी भांडारकर, चिटणीस प्रकाश वाघ,साहित्यिक रमेश पवार, पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक वाचनालयाचे संचालक ईश्वर महाजन यांनी केले. पत्रकार परीषदेत अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी साहित्य संमेलनाची रूपरेषा सांगतांना त्यांनी सर्व पत्रकार बांधवांचे व भगिनींचे आभार मानले. ते म्हणाले कि
सकाळी ग्रंथ दिंडी सोहळा 23 नोव्हेंबर 2019 रोजी शनिवारी दुपारी १ ते २-३० वाजेच्या दरम्यान पूज्य साने गुरुजी ग्रंथालय ते नाट्यगृह अशी आयोजित केली आहे विभागी खानदेशी बोली मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन दुपारी तीन ते चार वाजेला डॉ. राजन गवस नामवंत साहित्यिक साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त यांच्या शुभहस्ते होणार आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून अशोक कौतिक कोळी ज्येष्ठ साहित्यिक तर प्रमुख अतिथी अमळनेरच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता साहेबराव पाटील स्वागताध्यक्ष दिलीप सोनवणे अध्यक्ष सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय,
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी डाँ रणधीर शिंदे कोल्हापूर, साहित्यिक रमेश पवार, अशोक सोनवणे चोपडा, ज्योतीराम कदम पुणे ,डॉ विद्या पाटील जळगाव,हे मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. 23 नोव्हेंबर 2019 दुपारी साडेचार ते सात वाजता परिवर्तन जळगाव निर्मित अभिवाचन अमृता साहिर इमरोज प्रेम नाट्य, गांधी नाकारायचं आहे पण कसा? लेखक-दिग्दर्शक शंभू पाटील ज्येष्ठ रंगकर्मीे रात्री साडेसात ते साडेनऊ वाजता ,कवी संमेलन दिनांक 24 नोव्हेंबर 2019 रोजी कथाकथन सकाळी साडेनऊ ते अकरा वाजता, सकाळी साडेअकरा ते दोन वाजता मन्ही अहिराणी ना गोडवा, हा कार्यक्रम होणार आहे .त्यानंतर अडीच ते साडेतीन वाजता समारोप होईल व सांस्कृतिक कार्यक्रम दुपारी चार ते साडेपाच वाजता दर्याची लेकर पारंपरिक लोकगीते सादर करते शाहीर चिंतामणी शिवडीकर वरळी मुंबई हे सादर करणार आहेत.असे सांगितले.
यावेळी पत्रकार संजय पाटील यांनी साहित्य संमेलनासाठी सर्वातोपरी सहकार्य केले जाईल. अमळनेर नगरीत संमेलन होण्याचा मान मिळणे अभिनंदनीय गोष्ट आहे असे सांगितले.
यावेळी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी वाचनालयाचे विश्वस्त बापू नगावकर,सयुंक्त चिटणीस सुमीत धाडकर, संचालक भिमराव जाधव,पी.एन.भादलीकर, प्रसाद जोशी, ईश्वर महाजन उपस्थित होते.
