Halloween party ideas 2015


बालकांच्या पायाला टोचलेला काटा प्रत्येक संवेदनाक्षम मनाला बोचला पाहिजे - श्रीमती कविता सुर्वे, गट शिक्षणाधिकारी
शामकांत साळुंखे भिलाली व हरिष गाला मुंबई यांच्या दातृत्वातुन विदयार्थ्यांना शाळेचे बुट, पायमोजे, दप्तर, खाऊ वाटप .
दि ८ शेळावे ता पारोळा
आज जि. प .प्राथमिक शाळा धाबे ता पारोळा या ठिकाणी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेतील सर्व ५७  विदयार्थ्यांना मान्यवर दात्यांच्या दातृत्वातुन शाळेचे बुट, पायमोजे, शाळेचे दप्तर व लॉलीपॉप चॉकलेट मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता . आजच्या या स्तुत्य उपक्रमाला पारोळा पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी ताईसाहेब श्रीमती कविता सुर्वे व दाते शामकांत पोपटराव साळुंखे भिलालीकर,माध्यमिक शिक्षक लोणी हायस्कुल हे उपस्थित होते . अगोदर श्रीमती कविता सुर्वे यांची गट शिक्षणाधिकारीपदी निवड झाली म्हणुन धाबे शाळेकडुन त्यांचा शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ व भेटवस्तु देवुन सत्कार व अभिनंदन करण्यात आले . यावेळी परिसरातील जवळच्या उत्रड शाळेचे मुख्याध्यापक भुषण पाटील, तांबोळे शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र नांद्रेकर,हिरापुर शाळेचे मुख्याध्यापक विजय मेणे यांनीही त्यांचा यथोचित सत्कार केला . कार्यक्रमाला बहादरपूर बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी अण्णासाहेब  चंद्रकांत चौघरी यांची विशेष उपस्थिती व मार्गदर्शन लाभले . त्यांच्याही सर्व शाळांनी सत्कार केला . दाते शामकांत साळुंखे यांचेही स्वागत व सत्कार धाबे शाळेने केला . शामकांत साळुंखे यांनी मागे धाबे शाळेसाठी काही तरी करण्याची ईच्छा स्वतःहुन प्रकट केली होती . ज्या वेळी त्यांना सांगितले की शाळेतील बरेच विदयार्थी असे आहेत की त्यांच्या पायाला आजुन एकदाही पादत्राणे लागलेली नाही . पालकांनीही आजपर्यंत घेवुन दिली नाही . बालके रानावनात अनवाणी फिरतात, पायात काटे मोडुन आणतात, जखमा होतात  व ठेच लागते हे ऐकुन त्यांचे मन द्रवले व त्यांनी सर्व विदयार्थ्यांना चांगल्या प्रतीचे बुट भेट देण्याचे ठरविले . तसेच आपल्या पारोळा तालुक्याचे भुमीपुत्र देवगावचे .प्रशांत प्रभाकर जाधव - पाटील, उप पोलिस अधिकारी, एम. आर . ए .मार्ग पोलिस स्थानक मुंबई यांनी त्यांच्या मुंबईच्या मित्रांना धाबे शाळेच्या उपक्रमांची माहिती दिल्यावर गॉड व्हॅलिन्टर मुंबईचे एन्. जी .ओ. हरिष गाला साहेब यांनी सर्व विदयार्थ्यांसाठी स्पोर्ट पायमोजे, दप्तर व लॉलीपॉप चॉकलेट जाधव साहेबांच्या हस्ते दिवाळी भेट म्हणुन पाठवुन दिले . या वस्तुंचे वाटप आज श्रीमती कविता सुर्वे व शामकांत साळुंखे यांच्या शुभहस्ते करण्यात आले .
विदयार्थ्यांना सॅण्डल व बुट मोजे वाटपाचा हा गेल्या सात वर्षातील तीसरा कार्यक्रम शाळेने घेतला .
यावेळी गट शिक्षणाधिकारी श्रीमती कविता सुर्वे यांनी धाबे शाळा लोकसहभागातुन व येथिल शिक्षकही स्व खर्चाने गरीब आदिवासी विदयार्थ्यांना सर्व प्रकाराचे शैक्षणिक साहित्य व इतरही उपयुक्त साहित्य सतत वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबवितात . ह्या ठिकाणी बरेच विदयार्थी असे आहेत की त्यांच्या पायाला आजुन पादत्राणे लागलेली नाही हे ऐकुन वाईट वाटते . त्यांच्या पायाला लागलेले चटके त्यांना टोचलेला काटा समाजातील प्रत्येक संवेदनाक्षम व सक्षम मनाला बोचला पाहिजे व त्यांनीही शामकांत साळुंखे सर व हरिष गाला साहेब यांच्या सारखे गरिब व गरजु बालकांच्या मदतीसाठी स्वतःहुन पुढे आले पाहिजे . या दोघांचेही मी मनापासुन आभार मानुन अभिनंदन करते .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांनी केले .

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.