*मुख्यमंत्री पदासाठी छावाचा प्रस्ताव सादर*
*सोलापूर -: राज्यघटनेच्या कलम 163 अन्वये राष्ट्रीय छावा संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष योगेश नागनाथ पवार यांची मुख्यमंत्रीपदी तातडीने नियुक्ती करावी, यासाठीचा प्रस्ताव मा. राज्यपाल यांचेकडे सादर केला.*
*याबाबत सविस्तर हकीकत अशी की., राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झालेले असून शेतकर्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरी, सर्वसामान्य जनतेवर आसमानी संकट कोसळेले आहे. अशातच गेल्या 7-8 दिवसांपासून महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्र्या विना चालू आहे. त्यामुळे प्रशासनाला शेतकरी व जनतेच्या हिताचे निर्णय घेणे अवघड होत आहे. यामुळे महाराष्ट्रातील जनता अडचणीत सापडली आहे.*
*त्यामुळे राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात यावेत म्हणून मा. राज्यपाल यांनी विवेकबुद्धीने राज्यघटनेच्या कलम 163 अंतर्गत मुख्यमंत्री म्हणून छावाचे योगेश पवार यांची मुख्यमंत्रिपदावर तातडीने नेमणूक करून ठरलेल्या वेळेत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देवून घटनात्मक कार्यवाही/प्रोसेस पूर्ण करण्याची मागणी योगेश पवार यांनी केली आहे.*
*तसेच मुख्यमंत्रीपदासाठी घटनेत कोणतीही पात्रता विहित केलेली नाही, त्यामुळे मी मुख्यमंत्री पदासाठी पात्र आहे. 21 सप्टेंबर 2001 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मी विधानसभेचा सदस्य नसलो तरी येत्या 6 महिन्यांच्या आत विधानसभेचा सभासद म्हणून निवडून येण्याची हमी देवून मा. महामहिम राज्यपाल यांचेकडे राज्य घटनेच्या कलम 163 अंतर्गत मुख्यमंत्री म्हणून तातडीने नियुक्ती करण्याचा लेखी प्रस्ताव ईमेल, फॅक्स व पोस्टाव्दारे सादर केलेला आहे.*