वृत्तसंकलन करणाऱ्या क्राईम रिपोर्टर संभाजी देवरे यांना भ्रमणध्वनीवरून अव्वाच्च भाषेत शिवीगाळ
अमळनेर प्रतिनिधी
शिंदखेडा विधानसभा मतदार संघाचे वृत्त संकलन केल्यामुळे पत्रकार स्पेशल क्राईमचे रिपोंटर संभाजी देवरे यांना
दुरध्वनीद्वार अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या कार्यकर्त्यावर कायदेशीर कार्यवाही होणे बाबत नुकतेच मराठी पत्रकार संघाच्या वतीने निवेदन धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.
निवेदनात असे म्हटले आहे की मी,इंडिया अपराध कंट्रोल न्युज चा स्पेशल क्राईम रिपोटर आहे व लोकन्युज यु ट्युब
चॅनेलचा संचालक आहे. शिंदखेडा विभागसभा मतदार संघाची सार्वत्रिक निवडणूक २०१९ चे वृत्त
संकलन करुन लोकन्युज युट्युब चॅनेलवर दि. २५/१०/२०१९ रोजी बातमी प्रसिध्दी केली. त्याबातमीत
विजयी उमेदवार जयकुमार रावल व पराभूत उमेदवार संदिप बेडसे या दोघांचे वृत्त संकलन केले
होते. संदिप बेडसे पराभूत झाले या वृत्ताचा राग आल्याने मला दि. २५/१०/२०१९ रोजी रात्री ठिक
११.०० PM वाजता ९८९०२६३१६४या मोबाईल नंबर वरुन माझ्या ८००७७०६००९ या मोबाईल
नंबरवर संदिप बेडसे यांच्या कार्यकर्त्यांनी संपर्क करुन अश्लिल शिवीगाळ केली व धमकी दिली.
तसेच पुन्हच रात्री ११:१२ PM व ११:१६ PM वाजता ७७११८५१०१० या मोबाईल वरून माझ्या
८००७७०६००९ या मोबाईल नंबर वर संपर्क करुन मला अश्लील शिवीगाळ केली व धमक्या दिल्यात
तु अमळनेर मध्ये हि अशीच घाण केली तु कोणत्या जातीचा आहे? तु कोणाचा पोटचा आहे? का तु
चौधरी आहेस? बरेवाईट मोबाईलवर खालच्या दर्जाचे बोलत होते. पाच वर्ष तुला अमळनेर मध्ये
काढायचे आहेत की नाही? धमक्या देत होते. मी कुटूंबासह घरी असल्याने मला नाईलाजास्तव फोन
थोडा स्विऑफ करावा लागला. संदिप बेडसे पराभूत उमेदवार यांच्या कार्यकर्त्यांनी तीन वेळा माझ्याशी
केलेल्या संपर्काचे भाषण रिकार्डीग उपलब्ध आहे. तरी महाशयांनी मोबाईल नंबर ७७११८५१०१० व
९८९०२६३१६४ या कार्यकर्त्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी ही विनंती.
मी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा विभागीय सहसचिव या नात्याने अध्यक्षांच्या स्वाक्षरी सह रितसर लेटर पॅडवर अर्ज सादर करीत आहे. तरी त्यांचेवर योग्य ती कार्यवाही व्हावी
ही विनंती.
अमळनेर येथेही पत्रकार संघाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.