विद्यार्थ्यांना फराळ, मिठाई सह शैक्षणिक साहित्य वाटप .
दि २६, शेळावे ता पारोळा
आज जि प प्राथमिक शाळा धाबे ता पारोळा या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे या वर्षीही दिवाळीचा एक दिवस शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांनी आपल्या परिवारासह साजरा केला . हे या उपक्रमाचे आठवे वर्ष असुन दरवर्षी विदयार्थ्यांना व गावकरींना पर्यावरणपूरक फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचा संदेश देवुन हा उपक्रम राबविला जातो . धाबे हे आदिवासी भिल्ल समाजाची गरीब वस्ती . सण येतात जातात त्यात त्यांना पाहिजे तेवढे स्वारस्य नसते . पण मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे हे आठ वर्षापूर्वी धाबे शाळेवर हजर झाल्यापासुन प्रत्येक सणाचे महत्व गावकरी व विदयार्थ्यांना समजवुन त्या प्रमाणे साजरा करतात . दिवाळीच्या या आनंदाच्या दिवसात बालकांना एक दिवस का असेना दिवाळीचा व त्या सोबत फराळ व मिळाईचा आनंद मिळावा म्हणुन हा उपक्रम सुरु केला आहे . त्या प्रमाणे आजही अगोदर शाळा व परिसराची गावातील युवकाच्या सहकार्याने स्वच्छता व साफ सफाई करण्यात आली . लक्ष्मीपूजन म्हणुन झाडु व खरे धन बालकांचे पूजन करण्यात आले . विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक साळुंखे यांच्या पत्नी सौ चित्रा पाटील, गुणवंतराव पाटील यांच्या पत्नी सौ वैशाली पाटील शिक्षिका परिश्रम मतीमंद शाळा पारोळा, सौ वैशाली शिंपी, सौ पूनम क्षत्रिय यांनी स्वहस्ते बनविलेला घरगुती फराळ व मिठाई वाटप केली . तसेच विदयार्थ्यांना हिवाळी सुटीत तणावमुक्त स्वईच्छेने राष्ट्रपुरुषांच्या माहितीचे लेखन करण्याचा गृहपाठ पुर्ण करण्यासाठी वह्या व पेन शिक्षकांकडुन वाटप करण्यात आले . बालकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडुन वाहत होता . यावेळी अनिल शिंपी, मयुर शिंपी, गणेश क्षत्रिय , रोहित माळी, गणेश पाटील , रविंद्र वाघ , पै सिद्धराज साळुंखे यांचे सहकार्य लाभले .
