अमळनेर प्रतिनिधी-प्रभाग चौदामधील नगरसेविका कमलबाई पाटील व युवा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र पिंताबर पाटील दरवर्षी सालाबादप्रमाणे आपल्या प्रभागातील कोणताही सण असो ते सामाजिक बांधीलकी याची जाणीव ठेवून मिठाईचे वाटप करीत असतात. प्रभाग चौदामध्ये कामगार वर्षभर स्वच्छता व कोणत्याही प्रकारची कामे असली म्हणजे सामाजिक कार्यकर्ते रविंद्र पाटील यांच्या एका फोनवर येत असतात.त्यांचे वडील कै पिंताबर तात्या व आई नगरसेविका कमलबाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग चौदामध्ये सामाजिक कामासाठी नेहमी तप्तर असतात. दिवाळी सणाचे औचीत्य साधून अमळनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रं 14मधील सफाई कामगारानां दिवाळी निमित्त मिठाई भेट देतांना *नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील सोबत रवि पाटील, अशोक साळुंखेसर, मूकरदम गोपालभाऊ गजरे, राजेंद्र सनंदाशिव व नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.
