Halloween party ideas 2015


भाजपाच्या अंतर्गत वादाचा शिरीष चौधरीनां फटका
विदयामान आमदार अनिल पाटलांना झाला फायदा.
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)महाराष्ट्र राज्यातील विधानसभा २०१९ मधील निकाल एक्झिट पोलने जे दाखवले होते ते खोटे ठरले.महाराष्ट्रात युतीला १६२ जागावर समाधान मानावे लागले.तर राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाने जोरदार मुसंडी मारली १०४ जागापर्यत.अजून काग्रेंस पक्ष प्रचार करण्यासाठी कमी पडला.नाहीतर महाराष्ट्र राज्यातील चित्र वेगळे दिसले असते हे सांगणे नको.मनसेने एवढा प्रचार राज ठाकरे यांनी केला पण त्यांना एकावर समाधान मानावे लागले. तर अपक्षांची सर्वच पक्षांना डोकेदुखी ठरली.२१अपक्ष यावेळी निवडून आले. महाराष्ट्र राज्यातील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समजले असले कि मतदार हुषार आहेत केव्हा परिवर्तन घडवून येईल सांगता येत नाही. या निवडणुकीत माजी मंत्र्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला हे निश्चित. अनेक मंत्री आपल्या गुर्मीत होते..पण मतदार राजा हे सब जानती है!
असो निवडणूक आली कि यश अपयश सुरूच राहणार. पण आता निवडून आलेल्या उमेदवाराकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांनी प्रामाणिकपणे काम करावे लागेल हे तेवढेच सत्य.. नाहीतर कोणतेही यश कायमचे नसते,व कोणत्याही स्वरूपाचे अपयश कायमचे नसते हे तेवढेच सत्य.
  अमळनेर तालुक्यातील भाजपा व राष्ट्रवादी पक्षातील निवडणूक खुपच शेवटपर्यंत चुरसीची ठरली हे निश्चित. मागच्या २०१४ च्या निवडणुकीत भाजप,राष्ट्रवादी, अपक्ष अशी लढत होती त्याचा फायदा शिरीष चौधरीनां झाला होता. पण यावेळी भाजपाने शिरीष चौधरीनां टिकट दिल्याने पक्षाअंतर्गत विरोध होता.त्याचा परीणाम मतदानावर झाला हे निश्चित. जर शिरीष चौधरी यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली असती कदाचीत त्यांचा विजय झाला असता.दुसरे भाजप,शिवसेना पक्षातील  जे नेते शिरीष चौधरी यांच्या प्रचाराला फिरत असतांना त्याचा त्यांना फायदा झाला नाही. भाजपमध्ये राहून त्यांनी राष्ट्रवादी व भूमीपूत्राच्या पाठीशी उभे राहणे पसंत केले. म्हणून शिरीष चौधरीचा पराभव झाला. राष्ट्रवादी पक्षाचे अनिल पाटील व त्यांच्या कार्यकर्ते यांनी भूमीपूत्र हा मुद्दा शेवटपर्यंत लावून धरला.व सर्व समाज एका बाजूला येऊन इतर समाजातील मते मिळवण्यासाठी खेळीमध्ये यशस्वी ठरला.व दुसरा मुद्दा शेतकरी बांधवाचा जिवाळयाचा प्रश्न पाडळसरे धरण याला युती शासनाने निधीसाठी झुलवत ठेवले त्याचाही रोष जनतेत होता.भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ  यांच्या पत्नी आ.स्मिता वाघ यांचे खासदारकीचे तिकीट पक्षाने ऐनवेळी रद्द करण्यात आले. त्याचा रोष कार्यकर्ते यामध्ये होता.चौधरी बंधूंनी उन्मेष पाटलांचा प्रचार केला.त्यामुळे शिरीष चौधरीच्या प्रचारात वाघ दामपत्यं चार हात लांब राहिले. त्यांनी जर निवडणुकीत चौधरी बंधूंना सहकार्य केले असते तर निश्चितच शिरीष चौधरी आमदार झाले असते.दुसरीकडे माजी आमदार साहेबराव पाटील शिरीष चौधरी यांच्या बरोबर प्रचारात होते फक्त शरीराने.पण त्यांनी त्यांच्या बरोबर राहून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनिल पाटील यांना दिलेला शब्द पुर्ण केला हे निश्चित.
 असो आता अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या  बालेकिल्ला झाला हे निश्चित. ज्याप्रमाणे माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील राज्यात भाजप व शिवसेनेचे सरकार असायचे तरी विरोधी पक्षाचे आमदार असतांना
 निधी आण्यासाठी कमी पडले नव्हते. त्याच पद्धतीने आमदार अनिल पाटील यांना करावे लागेल हे निश्चित.
अमळनेर विधानसभा निवडणुकीत भाजपाचे शिरीष चौधरी यांना ८५१६३,तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे
 अनिल पाटील यांना ९३७५७ मते मिळाली. तर अनिल पाटील ८५९४ मतांनी विजय मिळवता आला.माजी आमदार शिरीष चौधरी यांचा पराभव पक्षाअंतर्गत वाद,जातीपातीचे राजकारण यामुळे पराभव झाला हे तेवढेच सत्य.
वास्तविक पाहता शिरीष चौधरी यांनी तालुक्यात अनेक विकास कामे केली होती.पण तालुक्यातील मतदारांनी विकासाला महत्त्व न देता भुमीपूत्र हा मुद्दा भावनिक केला.आणि  आमदार अनिल पाटलांचा  विजयाचा मार्ग मोकळा झाला.

बातमी गावाकडची या न्यूज पोर्टलच्या वतीने आमदार अनिल पाटलांना भावीवाटचालीब शुभेच्छा!

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.