महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन संगमनेरच्या वतीने स्वयंप्रेरीत बालाश्रम, खांडगाव येथील एड्सग्रस्त व अनाथ मुलांबरोबर दिवाळी साजरी करण्यात आली. सर्व मुलांना लाडू ,फरसाण, चिवडा, शंकरपाळे , चकली यांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसांडून वाहत होता.
शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचे अमुल्य कार्य जुनी पेन्शन हक्क संघटन करत आहे .जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या माध्यमातुन यापुर्वीही अनेक सामाजिक व समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यात आलेले आहेत.
यावेळी तालुका अध्यक्ष श्री . निलेश हारदे सर, जिल्हा उच्चाधिकार नेते श्री . शिवाजी आव्हाड सर, कोषाध्यक्ष श्री.विकास खेबडे सर, कार्याध्यक्ष श्री. रावसाहेब शिंदे सर व श्री जितेंद्र लोढा सर उपस्थित होते.