Halloween party ideas 2015


उदया शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पैलाड चोपडा रोडवरील स्व.बाळासाहेब ठाकरे चौकाचे अनावरण.

शिवसैनीकांनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन.

अमळनेर  प्रतिनिधी

 शिवसेना नेते व युवासेना प्रमुख मा आदित्यजी ठाकरे उद्या सायंकाळी अमळनेरात व त्त्यांचे हस्ते पैलाड चोपडा नाका परिसरात स्व.बाळासाहे ठाकरे चौकाचे अनावरण
लोकसभा निवडणुकीत शिवसेना व भाजपा उमेदवारांना ज्या मतदारांनी मतदान केले त्यांचे आभार मानण्यासाठी व ज्यांनी मतदान केले नाही त्यांची मने जिंकण्यासाठी व आशिर्वाद घेण्यासाठी मा आदित्यसाहेब ठाकरे उद्या दि 18 जुलै रोजी जळगांव जिल्हा दौऱ्यावर असून टे ते पाचोरा, जळगांव ,चोपडामार्गे अमळनेरला सायंकाळी 7 वाजता चोपडा नाका येथे त्यांचे आगमन होत असून तेथे त्यांचे हस्ते पैलाड शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने चोपडा नाका चौकाला स्व.बाळासाहेब ठाकरे चौक असे नामकरण मा आदित्यसाहेब यांचे हस्ते करण्यांत येणार आहे त्यांचे सोबत जिल्हासंपर्क प्रमुख मा संजय सावंत, नामदार गुलाबराव पाटील (राज्यमंत्री सहकार) गुलाबराव वाघ जिल्हाप्रमुख,हे उपस्थित राहणार असून मा आदित्यसाहेब शेतकरी बंधू, युवक, व जनतेशी काही वेळ हितगुज साधून जेष्ठांचे आशिर्वाद घेणार आहेत,ठाकरे परिवारातील व्यक्ती फार वर्षांतून अमळनेरात येत असल्याने शिवसेना युवासेना महिला आघाडी पदाधिकारी कार्यक्रमासाठी मेहनत घेत आहेत, तरी सर्वांनी दि 18 जुलै सायंकाळी 7 वाजता पैलाड चोपडा नाका येथे उपस्थिती द्यावी असे आवाहन शिवसेने तर्फे उपजिल्हाप्रमुख डॉ राजेंद्र पिंगळें तालुकाप्रमुख विजू मास्तर, शहरप्रमुख प्रताप शिंपी व संजय पाटील नगरसेवक यांनी केले आहे

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.