शिंदखेडा येथील आदिवासी पारधी कुंटुबातील ज्योत्स्ना हिने विधी पदविकेत प्रथम क्रमांक पटकावल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे
अमळनेर प्रतिनिधी
शिदखेड़ा तालुक्यातील गाव चिरणे कदाणे येथील कन्या ज्योत्स्ना पारधी हिने धुळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात एलएलबी पदवी च्या अंतिम वर्षात प्रथम श्रेणीत क्रमांक पटकावला असून तिचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
ज्योत्स्ना हिने शिंदखेडा
येथील एस एस डी पी एस महाविद्यालयातून कॉम्पुटर
सायन्स मधून पदवी प्राप्त केलेली आहे. ज्सोत्स्ना हिचे समाज बांधवान कडुन पुढील वाटचालीस भरभरुन शुभेच्छा दिल्या जात आहे,आणि कौतुक सुद्धा होत आहे, ज्योत्स्ना हिचे वडील आबा पारधी हे शिंदखेडा पंचायत समिती येथे कनिष्ठ सहाय्यक या पदावर कार्यरत आहेत