माध्यमिक शाळेतील सेवानिवृत्त व पाच वर्षाच्या आतील सेवा शिल्लक राहिलेल्या मुख्याध्यापकांना शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमातून सूट मिळणार.
संगिताताई शिंदे यांच्या प्रयत्नाला यश.
अमळनेर प्रतिनिधी
या संदर्भात संगीताताई शिंदे यांनी शासनास पत्र लिहून राज्यातील माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक जे सेवानिवृत्त झालेत तसेच सेवानिवृत्त च्या उंबरठ्यावर आहेत त्यांच्या 7 वे वेतन आयोगाच्या वेतन निश्चिती करीता अडचणी निर्माण करण्यात आल्या होत्या. तेव्हा अनेक मुख्याध्यापक यानी सौ संगिता शिंदे यांचे कडे तक्रार दाखल केल्यात या तक्रारीची गँभीर दखल घेत 13 जून 2005 च्या शासन निर्णयातील त्रुटी संदर्भात शासनास अवगत केले की अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापक पद हे कमी कालावधी करीता मिळते असे मुख्याध्यापक शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम *DSM*पूर्ण करू शकत नाहीत त्यामुळे सेवानिवृत्त व ज्या मुख्याध्यापकांची सेवा 5 वर्षांपेक्षा कमी राहिली आहे त्यांना सदर अभ्यासक्रम मधून सूट मिळावी असे शासनास निदर्शनास आणून दिले. तेव्हा शासनाने सौ संगीता शिंदे यांच्या पत्राची दखल घेत शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव,मा स्वप्नील कापडणीस
यांनी याबाबत शिक्षण संचालक( माध्य व उच्च माध्यमिक) पुणे यांना त्वरित कार्यवाही करून शासनास माहिती सादर करण्यास आदेश दिले.
या पत्रामुळे व शिक्षण संघर्ष संघटनेच्या राज्याध्यक्ष सौ संगीता शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे राज्यातील हजारो मुख्याध्यापक यांना दिलासा मिळणार आहे असे जळगाव जिल्हा जुन्या पेन्शन समिती संघर्ष समितीचे जिल्हाअध्यक्ष संभाजी पाटील यांनी बोलतांना सांगितले