अमळनेर तालुक्यातील दुध विक्रेत्याने दाखविली ईमानदारी,40000हजार रुपयाचा अँँपल कंपनी चा मोबाईल केला परत.
अमळनेर प्रतिनिधी
तालुक्यातील लोंढवे गावातील दुध विक्रेता भटु दयाराम पाटील सकाळी महाराणा प्रताप चौकातील राजभवन शेजारी असलेल्या नाश्ता दुकानात नाश्ता करीत असताना हार्दिक सोनार याचा अँँपल कंपनी चा दुचाकी चालवित असतांना गतीरोधकावर गाडी उदळल्याने मोबाईल खिशातून रस्त्यावर पडला भटु पाटील हे नाश्ता करून निघत असताना त्यांना मोबाईल सापडला.त्यांनी ईकडे तिकडे विचारना केल्यावर मोबाईल कोणाचा आहे हे माहीत नव्हते.हार्दिक हा घरी आल्यावर त्याला समजले की त्याच्या मोबाईल खिशातून कुठेतरी पडला त्याने शोधाशोध सुरू केल्यानंतर त्याने त्याच्या मोबाईलवर फोन लावला व लगेच भटु पाटील यांनी फोन उचलून मला मोबाईल सापडला आहे व मी मराठा मंगलकार्यालयाजवळ दुध विकत आहे तु लगेच ये असे सांगितले.व हार्दिक हा लगेच मंगलकार्यालयाजवळ आल्यावर दुध विक्रेता भटु पाटील यांनी ईमानदारीने मोबाईल परत केला.हार्दिक ने त्यांचे अभिनंदन केले.व सांगितले की आजही आपल्या कडे मानुसकी व ईमानदारी चे दर्शन घडत आहे .व लगेच तेथील दुध घेण्यास आलेल्या नागरिकांनी भटु पाटील यांचे कौतुक केले.