गजानन भक्तांनी लाभ घ्या.
अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर येथील कै दादासाहेब जी.एम सोनार नगर मुंदडानगर गेटसमोरील भावीकांचे श्रध्दास्थान, व प्रतिशेगांव म्हणून नावारूपाला आलेल्या संत गजानन महाराज मंदीरात गजानन विजय पारायण रविवारी दिनांक २८/७/२०१९ रोजी ठाणे येथील प्रसिद्ध विदयाताई पडवळकर यांचे मुखदगत पारायण सकाळी ७ वाजेपासून आयोजित केले आहे.
तरी अमळनेर तालुक्यातील संत गजानन परीवारातील भावीक भक्तांनी पारायण नावनोंदणी मंदिरात केली आहे. तरी आपली नावनोंदणी करावी व पारायण ठिकाणी फराळाची व्यवस्था केली आहे. असे संत गजानन महाराज सेवा संस्थानचे अध्यक्ष प्रा.आर.बी.पवार व संचालक मंडळाने एका पत्रकाद्वारे कळविले आहे.