Halloween party ideas 2015

अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा २५ जुलैला गुणगौरव सोहळा.

धुळे प्रतिनिधी(काशिनाथ माळी)

 धुळे समस्त माळी समाजातील गुणवंत मुला मुलींचा व इतर क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी बजावून लौकीक मिळविलेल्या यशवंताचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने दि. 25 ऑगस्ट रोजी करण्यात येणार असल्याचे 
संघटनेच्या बैठकीत ठरले आहे. 
अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष विलासराव पाटील हे अध्यक्षस्थानी होते. तर बैठकीत विभागीय अध्यक्ष वासुदेव देवरे, जिल्हाध्यक्ष आर.क.माळी, विभागीय प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र गवळी ,भरत रोकडे, भिला पाटील, काशिनाथ माळी, दिलीप घरटे,धनंजय घरटे,अॅड. ज्ञानेश्वर माळी,राजेन्द्र माळी, भिका माळी,गणेश खलाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 
अखिल भारतीय माळी महासंघाची बैठक नुकतीच धुळे येथे महाजन हायस्कूलमध्ये संपन्न झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यात माळी समाजातील इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या परीक्षेत 80 टक्के  व 75 टक्के गुण व पदवी - पदव्युत्तर परीक्षेत 70 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या मुला मुलींचा  व इतर स्पर्धा परीक्षेत विशेष यश मिळविलेल्या यशवंताचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा करण्याचे ठरले आहे. पंचवीस ऑगस्ट रोजी गुणगौरव सोहळा होणार आहे. माळी समाजातील उच्च पदावर कार्यरत मान्यवरांचे व जिल्ह्यातील माळी समाजाचे नगरसेवक या सोहळ्यामध्ये विशेष अतिथी म्हणून सहभागी असतील. यावेळी बैठकीत विलासराव पाटील यांनी माळी समाजाच्या कार्यकर्त्यांसाठी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर घेण्याचे ही मनोदय व्यक्त करीत संघटना घराघरात पोहचली पाहिजे यासाठी समाजाचे काम करण्याचा सल्ला ही दिला.सप्टेंबर महिन्यात माळी समाजाचा विशाल मेळावा घेण्याचे ही त्यांनी सांगितले. यावेळी विभागीय अध्यक्ष वासुदेव देवरे व इतर पदाधिकारी यांनी खुला सुसंवाद केला. गुणगौरव सोहळ्यासाठी विलासराव पाटील, वासुदेव देवरे, शिंदखेडा न.पं चे प्रभारी नगराध्यक्ष भिला पाटील, डॉ. सुशील महाजन यांनी गुणवंतासाठी फोल्डर फाईल देणगी जाहिर केली.तर चेतना हरिचंद्र माळी यांनी 5 हजार रूपये, व म्हसाळे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच  गुलाब माळी व सुनील भटू माळी यांनी प्रत्येकी अकरा हजार रूपये, धनंजय विश्वनाथ घरटे दोन हजार पाचशे रूपये, तसेच दिलीप घरटे, विलास घरटे, अविनाश माळी, विनय ओंकार माळी, श्रीराम माळी, संतोष माळी, तुकाराम खलाणे,संदीप माळी,किशोर माळी, हिमंतराव माळी, गणेश माळी यांचे सह अनेक दात्यांनी देणगी दिली.बैठकीत प्रा. भगवान माळी,सुनील माळी, भरत माळी, साक्री तालुका अध्यक्ष पराग गवळे,विलास घरटे,सदाशिव माळी,कैलास रोकडे,नितीन माळी, शांताराम माळी, प्रमोद रोकडे, चंद्रकांत माळी,नाना माळी,वसंत माळी, रमेश माळी, डॉ. सतीश बोढरे,अनिल माळी,मनोज सोनवणे, आदी सहभागी होते. समाजाच्या मुला मुलींनी दहा ऑगस्ट पर्यंत आपले निकालाचे गुणपत्रिका माळी महासंघाचे शिरपूर तालुका - सुनील भेटू माळी मांडळ,भरत रोकडे शिरपूर, शिदखेडा तालुका - भिला पाटील, गणेश खलाणे, व सदाशिव माळी यांचेकडे तर साक्री तालुका - प्रा.भगवान जगदाळे, पराग गवळे, तुकाराम खलाणे, पिंपळनेर ग्रामीण -  राजेन्द्र गवळी, धनंजय घरटे, विलास घरटे, प्रा.राजेन्द्र सोनवणे , गिरीश पगारे, धुळे शहर- हेमंत रघुनाथ माळी प्रा.नामदेव माळी व सथीश माळी तर धुळे ग्रामीणसाठी - रमेश माळी,कैलास रोकडे, सदाशिव माळी, सुनील जाधव, डॉ. सतीश बोढरे, अनिल माळी, मनोज सोनवणे व सतीश जाधव यांच्याकडे गुणपत्रिक जमा करण्याचे जिल्हाध्यक्ष आर.के.माळी यांनी आवाहन केले आहे. 

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.