अंगणवाडी केंद्रांचे समायोजन रद्द करा, या मागणीसाठी जळगाव जिल्हा परिषदेवर अंगणवाडी कर्मचा-यांचा मोर्चा
अमळनेर प्रतिनिधी
जळगांव जिल्हयातील ३४७२ अंगणवाडी केंद्रांपैकी ५०० मीटर अंतर्गत येणा-या सुमारे २३३६ अंगणवाडी केंद्रांचे समायोजन करण्याबाबत मा. आयुक्त, एकात्मिक बालविकास सेवा योजना, नवी मुंबई यांच्या आदेशान्वये महिला व बालविकास अधिकारी जिल्हा परिषद जळगांव यांनी दि. ०८/०७/२०१९ रोजी
बालविकास प्रकल्प अधिकारी यांना आदेश दिले आहेत. अंगणवाडी केंद्रांचे समायोजन झाल्यास जिल्हयातील
सुमारे ४६०० विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत, प्रौढ कुमारीका, व कुटुंब प्रमुख अंगणवाडी सेविका, मदतनीस
व मिनी अंगणवाडी सेविका बेरोजगार होणार आहेत. म्हणून कोणत्याही परिस्थितीत अंगणवाडी केंद्रांचे
समायोजन करण्यात येवू नये.
अंगणवाडी केंद्रांचे काम जलदगतीने होण्यासाठी अंगणवाडी सेविकांना शासनाने मोबाईल हॅण्डसेट
पुरविले आहेत. परंतु त्यापैकी बहुसंख्य मोबाईल हॅण्डसेट नादुरुस्त व बिघाड झालेले आहेत. सदर नादुरुस्त
व बिघाड झालेले मोबाईल हॅण्डसेट दुरुस्तीसाठी अंगणवाडी कर्मचा-यांवर वरिष्ठांकडून स्वखर्च करण्याची
जबरदस्ती केली जात असून भाग पाडले जात आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांचे आर्थिक नुकसान होत आहे. म्हणुन नादुरुस्त व बिघाड झालेले हॅण्डसेटच्या दुरुस्तीची जबाबदारी शासनाने घ्यावी किंवा दुरुस्तीसाठी अंगणवाडी सेविकांना निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. मोबाईल दुरुस्तीसाठी अंगणवाडी कर्मचा-यांना खर्च करणान्यास भाग पाडणान्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी. शिरुड बिट ता. अमळनेर, गारखेडा बिट, फत्तेपुर बिट ता. जामनेर या बिटातील अंगणवाडी कर्मचा-यांचे थकीत मानधन विनाविलंब अदा करण्यात यावे. मा. सचिव, महिला व बालविकास विभाग यांच्या आदेशानुसार जिल्हयातील अंगणवाडी सेविका,
मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना ओळखपत्र पुरविण्यात यावेत. अंगणवाडी कर्मचा-यांना सुमारे २ वर्षापासूनचे प्रवासभत्ते बिलाची थकीत रक्कम मा. आयुक्त यांच्या
आदेशानुसार त्वरीत अदा करण्यात यावीत.आदिवासी विभागातील अंगणवाडी कर्मचा-यांच्या भर्तीवरील उठविलेल्या निबंधाप्रमाणे ग्रामीण व
नागरी विभागातील भर्तीवरील निबंध तातडीने उठवावेत. खडकी ता. चाळीसगाव येथील अंगणवाडी कर्मचा-यांशी हुज्जत घालणा-या व अश्लील शिवीगाळ करणा-या गावातील इसमाविरुध्द ताबडतोबीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
या व अन्य प्रश्न आणि अडचणी सोडविण्यासाठी जिल्हयातील अंगणवाडी कर्मचारी दि. १६/०७/
२०१९ रोजी दुपारी १.०० वाजता शिवतीर्थ मैदान येथुन संघटनेच्या अध्यक्षा मायाताई परमेश्वर, कार्याध्यक्ष
रामकृष्ण बी. पाटील व युवराज बैसाणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला आणि वरील प्रश्नांचे निवेदन जिल्हा परिषद प्रशासनाला देवून सविस्तर चर्चा केली. सदर मोर्चा जिल्हयातील हजारो अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांनी भागिदारी केली. मोर्चा यशस्वी करण्यासाठी मिनाक्षी चौधरी, मंगला नेवे, चेतना गवळी, सविता महाजन, पुष्पा परदेशी, संगिता निंभोरे, शंकुतला चौधरी,
रेखा नेरकर, रमा अहिरे, सुनंदा नेरकर, उज्वला पाटील, साधना पाटील, बेबी पाटील, शोभा जावरे, सरला
पाटील, आशा जाधव, रत्ना सोनवणे, आक्का सपकाळे, वंदना कंखरे, नंदा देवरे, सुनीता नेतकर, सविता
वाघ, ज्योती पाटील, सुलोचना पाटील, सुरेखा मोरे, मिना गढरी, निता सपकाळे यांनी प्रयत्न केलेत.