Halloween party ideas 2015


जुन्या पेंशनसाठी अभ्यास गटाची स्थापना -  सौ.संगीताताई शिंदे

मुंबई प्रतिनिधी

1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदानित अंशतः अनुदानित शाळा किंवा तुकडीवर नियुक्त व 1 नोव्हेंबर 2005 नंतर 100% अनुदान प्राप्त झालेल्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना जुनी पेंशन मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संघर्ष संघटनेने वेळोवेळीे केलेली मागणी व त्यासाठी सौ. संगीताताई शिंदे यांनी सातत्याने केलेला पाठपुरावा, दि.18 जून ते 25 जून 2019 दरम्यान आझाद मैदान, मुंबई येथे केलेले आमरण उपोषण, दरम्यानच्या अधिवेशन काळात विधानसभा व विधानपरिषदेमधे झालेल्या लक्षवेधी व त्यानुसार विधानपरिषद सभापती मा. रामराजे निंबाळकर यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आज मा.ना.आशिष शेलार,शिक्षणमंत्री  महाराष्ट्र राज्य यांची  सौ. संगीताताई शिंदे यांचे नेतृत्वाखाली  शिष्टमंडळानेभेट घेतली असता त्यांनी उद्या संध्याकाळपर्यंत अभ्यासगटाची  स्थापना केल्याचे पत्र निर्गमित करण्याचे आश्वासन दिले.
     तसेच यावेळी उच्च न्यायालयाचा अंतिम निकाल लागलेला नसताना, शासन या सेवकांना जुनी पेंशन देण्याच्या मुद्द्यावर सकारात्मक असताना मा.शिक्षण उपसचिव यांचे दि.6 व 10 मे, व शिक्षण संचालक यांचे दि. 13 मे 2019 या पत्रांचा संदर्भ देऊन राज्यातील काही वेतन पथक अधीक्षक यांनी अशा सेवकांचे चालू पी एफ खाते बंद करून डी सी पी एस खाते खोलण्याचे आदेश दिल्याचे मा. शिक्षण मंत्री महोदयांच्या तसेच मा.शिक्षण उपसचिव यांच्या लक्षात आणून दिले. मुळात ही परिपत्रके एवढ्या घाईगडबडीने काढण्याची घाई काय व त्यांच्या अंमलबजावणीत एवढी विविधता कशी? याच प्रकारे क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून पी एफ कपात चालू बंद करण्यामध्ये सन 2010 पासून 2019 पर्यंत सेवकांची पिळवणूक झाली असल्याची बाब मंत्रीमहोदयांच्या निदर्शनास आणण्यात आली. पी एफ कपातीस स्थगिती दिल्याचे पत्रही रद्द होईल.त्यासाठी संगीताताई स्वत: मुंबईत थांबल्या आहेत.त्या उद्या पत्र घेऊनच येतील.
   या शिष्टमंडळामध्ये ताईंसोबत  श्री नितीन घुडगे,विकास दिवे, शरद तिरमारे, सुनील भोर , बंडू मखरे, देवराव दरेकर देविदास खेडकर, महेंद्र हिंगे, सुनील दानवे,अशोक रसाळ,वाजीद शेख,चौधरी सर, म्हात्रे सर, कदम सर इ. उपस्थीत होते

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.