एस.बी.पाटील आदिवासी मुलींची निवासी आश्रमशाळा लोहगाव ता.शिंदखेडा जि.धुळे येथे शैक्षणिक साहित्य वाटप.....!*
अमळनेर प्रतिनिधी
सेवा सहयोग,पुणे व युवकमित्र परिवार यांच्यातर्फ लोहगाव ता.शिंदखेडा येथील एस.बी.पाटील आश्रमशाळा येथे 200 विद्यार्थींना स्कुल बॅग,वह्या, कंपास पेट्या व इतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या सचिव सौ.रंजनाताई पाटील,प्रमुख अतिथी म्हणून उत्कृष्ट निवेदक श्री.गोरख वाल्हे,युवकमित्र परिवाराचे संस्थापक प्रवीण महाजन, शाळेचे मुख्याध्यापक श्री.राजेंद्र पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री.एस.बी.पाटील निवासी शाळेत नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव,अक्कलकुवा,तळोदा,शहादा या तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थिनींना मोफत शिक्षण दिले जाते.सदरील शाळेला कुठल्याही प्रकारचे शासकीय अनुदान मिळत नाही.युवकमित्र परिवार 3 वर्षापासून विविध स्वरूपाची मदत करत असल्याचे व शाळेच्या व्यवस्थापन बद्दल अभिमान असल्याचे मत युवकमित्र परिवार चे प्रवीण महाजन यांनी व्यक्त केले.उत्कृष्ट निवेदक श्री.गोरख वाल्हे यांनी विद्यार्थिनींना भविष्यात चांगले शिक्षण घेऊन आपल्या आदिवासी समाजाचे ऋण फेडण्याचे आवाहन केले.संस्थेच्या सचिव श्रीमती रंजनाताई पाटील यांनीसुद्धा मनोगत व्यक्त केले.मुख्याध्यापक श्री. राजेंद्र पाटील यांनी आभार मानले.