माध्यमिक विद्यालय अंबापिंपरी शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
अमळनेर प्रतिनिधी
ग्राम विकास शिक्षण संस्था संचालित माध्यमिक विद्यालय अंबापिंपरी या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी आजचा दिवस गुरु प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे असे गौरवोद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री पी व्ही पाटील यांनी मांडले यावेळेला संपूर्ण कार्यक्रम हा इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थ्यांनी घडवून आणला विद्यार्थ्यांच्या कार्याची शाबासकी श्री हेमकांत लोहार यांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केले त्याच बरोबर श्री के जी कचवे यांनी व्यासांचा इतिहास मांडला यावेळेला विशेष बाब म्हणजे निसर्ग सुद्धा आपला गुरू आहे त्याचे संरक्षण व संगोपन करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे याचा आधार घेऊन विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वतःच्या पॉकेटमनीमधून वड लिंब रोपांची खरेदी करून शाळेच्या आवारात वृक्षारोपण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी पूजा माळी व प्रगती माळी यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्या विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटून गोड तोंड करण्यात आले