अमळनेर राजपूत एकता मंच सह अनेक मान्यवरांकडून मदतीचा हात
अमळनेर-शहरातील श्रीकृष्ण कॉलनीतील दुमजली घर अचानक कोसळल्याने बेघर झालेल्या प्रितम तवर यांच्यासह त्यांच्या पत्नीला या संकटातुन सावरण्यासाठी अनेक जण पुढे सरसावले असून अमळनेर तालुका राजपूत एकता मंच सह काही राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी आर्थिक मदतीचा हात दिला आहे.
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांनीही काल भेट देऊन आस्थेवाईकपणे मदत दिली.व मातीमोल झालेला संसार सर्वांच्या एकत्रिकरणातून पुन्हा उभा करू असे संकेत दिले. दि 30 रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती,सुदैवाने यात घरातील पती व पत्नीचा जीव वाचला मात्र घरातील सर्व सहित ढिगाऱ्याखाली दाबले गेल्याने संसारपयोगी वस्तू मातीमोल होऊन हे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले,दोन वेळेच्या जेवणासाठी देखील त्यांना दुसऱ्याच आसरा घ्यावा लागत आहे.अश्या परिस्थितीत शासकीय मदत मिळेल किंवा नाही हे अनिश्चित असताना समाजमन जागृत होऊन मदतिसाठी पुढे येत असल्याने या कुटुंबास मोठा धीर आला आहे.राजपूत एकता मंचच्या सदस्यांनी काल तवर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पीडित पती व पत्नी यांना धीर दिला व संघटनेच्या वतीने आर्थिक मदत दिली,तर मंचचे सदस्य देखील वैयक्तिक रक्कम जमा करीत असून ती रक्कम देखील तवर यांना सुपूर्द करणार आहेत. देऊन
कळमसरे येथील पिंटू राजपूत व भोरटेक येथील दिलीपसिंग पाटील यासह इतरांनी आपापल्या गावातून धान्य अथवा इतर मदत जमा करण्याचे नियोजन करीत असल्याचे सांगितले.
यावेळी मार्केट सभापती उदय वाघ,भाजपाचे शहराध्यक्ष शितल देशमुख तसेच राजपूत एकता मंचचे अध्यक्ष रणजित पाटील,दिलीपसिंग पाटील,ऍड दीपेन परमार,अजयसिंग पाटील,दिपेंद्र पवार,अनिल पाटील,चेतन राजपूत,मच्छीन्द्र पाटील,जितेंद्र राजपूत,राजेंद्र पाटील,रामलाल पाटील,विजय राजपूत,मुकेश राजपूत,जयदीप राजपूत,दत्तात्रय पाटील,राजुसिंग परदेशी,भटुसिंग राजपूत,जयसिंग पाटील,कुणाल गिरासे,गजेंद्रसिंग राजपूत यासह समाजबांधव उपस्थित होते.