Halloween party ideas 2015


 ३ जुलै भोजनाच्या सुटीत जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उग्र, निर्देशन करून लक्षवेधी दिवस पाळा.

अमळनेर प्रतिनिधी

आपणांस सूचित करण्यात येते की, राज्यकर्मचारी ,सरकारी, निमसरकारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीने अंशदायी पेन्शन योजना रद्द करून १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना सुरु करावी, व इतर मागण्याकडे लक्षवेध करण्यासाठी  दिनांक ३ जुलै २०१९ रोजी सर्व कार्यालयात भोजनाच्या सुट्टीत उग्र निदर्शन करून,घोषणा देत 'लक्षवेधी दिन पाळण्याचे ठरविले आहे.
       
            आपली संघटना अविरतपणे नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करून १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना सुरु करावी यासाठी आंदोलने करीत आहे. होणाऱ्या 'लक्षवेधी दिन' आंदोलनात अंशदायी पेन्शन योजना रद्द करून १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना सुरु करावी ही मागणी प्रामुख्याने असल्याने उपरोक्त आंदोलनात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन समन्वय समितीचा भाग असल्याने सक्रिय सहभागी होत आहे.
  उपरोक्त  आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे. यानंतर ही शासनाने आपल्या मागण्याबाबत असेच उदासीन धोरण ठेवले तर समन्वय समितीच्या वतीने मंगळवार दि.२० ऑगस्ट २०१९ रोजी राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक संप जाहीर करण्यात येणार आहे. समस्त कार्यकारिणी
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन महाराष्ट्र द्वारा- श्री सुशिल धनंजय भदाणे 
अध्यक्ष अमळनेर तालुका जुनी पेन्शन हक्क संघटना यांनी केला आहे.
            
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.