अमळनेर राजपूत एकता मंच तर्फे निषेध,प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
अमळनेर-अखंड भारताचे राष्ट्र गौरव विर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्यासारख्या देशासाठी संपूर्ण जिवन समर्पित करणाऱ्या महान विभूतींबद्दल प्राथमिक शाळेच्या इयत्ता सातवीच्या इतिहास व नागरीशास्त्र शालेय पुस्तकातील
दुस-या धडयात शिव पूर्णकालीन भारताचे या धड्यामध्ये महाराणा प्रतापसिंह यांच्या नावाबद्दल एकेरी भाषेत उल्लेख झाला आहे,या बाबींचा अमळनेर तालुका राजपूत एकता मंचच्या वतीने निषेध व्यक्त करून अमळनेर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
सदर प्रकारामुळे संपूर्ण भारतातील राजपूत बांधव व महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रेमींच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत,याचा सर्व स्तरावरुन तिव्र निषेध केला जात आहे. तरी शासनाने सदर
पुस्तक त्वरीत रद्द करुन योग्य ती सुधारणा करावी. तसे न झाल्यास राजपुत समाज बांधवा कडून मोठे अंदोलन उभे करण्यात येईल,असा इशारा देण्यात आला आहे.
जयंतीदिनी शासकीय कार्यालयात राणा प्रतापांचे पूजन नाही
महाराणा प्रताप यांच्या जयंती दिनी दि 6 जून रोजी शासन आदेशान्वये अमळनेर नगर परिषद कार्यालयाव्यतिरिक्त इतर शासकीय कार्यालयात प्रतिमा पूजन न झाल्याने राजपूत समाज व राणा प्रताप यांच्या प्रेमींच्या भावना दुखावल्या असून हा राष्ट्रपुरुषांच्या सन्मानाचा अवमान आहे,यामुळे संबधित कार्यालय प्रमुखांना नोटीस बजावून कारवाई व्हावी या मागणीचेही निवेदन यावेळी प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले.
निवेदनाच्या प्रति पालकमंत्री जळगांव जिल्हा जळगांव,जिल्हाधिकारी जळगांव व विभागीय आयुक्त नासिक यांना देण्यात आल्या आहेत.निवेदनावर अध्यक्ष रणजित भिमसिंग पाटील,दिलीपसिंग पाटील,ऍड दीपेन परमार,अजयसिंग पाटील,दिपेंद्र पवार,अनिल पाटील,चेतन राजपूत,मच्छीन्द्र पाटील,जितेंद्र राजपूत,राजेंद्र पाटील,रामलाल पाटील,विजय राजपूत,मुकेश राजपूत,जयदीप राजपूत,दत्तात्रय पाटील,राजुसिंग परदेशी,भटुसिंग राजपूत,जयसिंग पाटील,कुणाल गिरासे,गजेंद्रसिंग राजपूत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.प्रांतांच्या वतीने शिरस्तेदार यांनी निवेदनाचा स्वीकार केला.