गटशिक्षणाधिकारी आर डी महाजन
गडखांब केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परीषद जि प उच्च प्राथमिक देवळी येथे संपन्न.
अमळनेर प्रतिनिधी- शाळेत शिक्षकांनी शैक्षणिक साहित्याचा वापर अध्यापनात केला व शाळेचा परिसर स्वच्छ असेल तर अध्यापन हेच प्रभावी होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हायला वेळ लागत नाही असे म्हणून पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आर डी महाजन केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत गडखांब केंद्राचे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा देवगाव देवळी येथे मार्गदर्शन करताना बोलत होते.
ते पुढे म्हणाले की अध्ययन निष्पती तक्ते स्वच्छतागृह शैक्षणिक साहित्य स्पर्धा परीक्षा नियोजन याकडे मुख्याध्यापक व शिक्षकांनी लक्ष दिल्यास प्रगत महाराष्ट्र होण्यासाठी वेळ लागणार नाही प्रत्येक शिक्षकांनी सकारात्मक काम करणे गरजेचे आहे असे सांगितले.
व्यासपीठावर जिल्हा परिषद शाळा देवळी चे मुख्याध्यापक खेमराज बोरसे, महात्मा फुले हायस्कूल देवळीचे मुख्याध्यापक अनिल महाजन, विकास जाधव, विठ्ठल पाटील ,विद्यादेवी कदम होते अध्यक्षस्थानी प्रभारी केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर पाटील होते. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन करून करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्ताविक देवळी प्राथमिक शाळेचे शिक्षक राजेंद्र पाटील यांनी केले. शिक्षण परिषदेमध्ये रतिलाल महाले, राजेंद्र गवते मनिलाल पाटील राजेंद्र पाटील श्रीमती मैलागिर यांनी प्रभावी अध्यापन कसे करावे यावर मार्गदर्शन केले. शिक्षण परिषदेत नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणातून ज्ञानेश्वर पाटील म्हणाले की गडखांब केंद्राचा केंद्रप्रमुख म्हणून माझ्याकडे चार्ज असला तरी आपण सर्वांनी मला सहकार्य करावे पुढे होणाऱ्या शिक्षण परिषदेमध्ये अध्यक्षस्थान ज्येष्ठ शिक्षक किंवा मुख्याध्यापकांनी भूषवावे असे सांगितले व पुढे ते म्हणाले की शासनाने वरिष्ठ पातळीवरून ज्या काही नवीन सूचना कागदपत्रे असतील त्या प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांनी वेळेवर दिले तर काम करणे सोपे जाते यासाठी सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे .व शिक्षण परिषदमध्ये जे नवीन विषयावर चर्चा झाली कि ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन राजेंद्र पाटील यांनी केले. यावेळी किशोर पाटील ,मंगला बोरसे,प्रदीपकुमार पाटील, सरला बाविस्कर ,भानुदास माळी राजमल बोरसे ,छोटू पाटील, वैशाली लोखंडे ,मंगला पाटील, प्रतिभा बोरसे, सुवर्णा निळ,ईश्वर महाजन , प्रतिभा बोरसे सह शिक्षक व शिक्षिका मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.