Halloween party ideas 2015


धुळ्यात नामदार अरुण देशपांडे साहेबांना अंमळनेरचे ग्राहक पंचायतीची शिष्टमंडळ भेटले!

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर- महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय सरचिटणीस माननीय नामदार अरुण देशपांडे साहेबांचा दोन दिवसांचा शासकीय दौरा नुकताच संपन्न झाला. या दौऱ्यामध्ये त्यांनी धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री राहुल रेखावार साहेब यांच्या उपस्थितीत धुळे जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ शासकीय अधिकारी व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे धुळे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत एक शासकीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी जळगाव जिल्ह्याचे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष श्री विकास महाजन  साहेबांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी अंमळनेर तालूका ग्राहक पंचायतीचे शिष्टमंडळ, तालुका अध्यक्ष मकसूदभाई बोहरी, तालुका संघटक राजेंद्र सुतार महिला आघाडी प्रमुख सौ भारती अग्रवाल सचिव विजय शुक्ल प्रसिद्धीप्रमुख जयंतीलाल वानखेडे कमलेश वानखेडे उर्जा मित्र सुनील वाघ आदी उपस्थित होते. या मिटींगमध्ये राजेंद्र सुतार यांनी लक्झरी बसची अवाजवी भाडेवाढीची तक्रार केली आणि त्यांच्यावर पायबंद घालण्याची मागणी केली. मकसूद भाई बोहरी आणि विजय शुक्ल यांनी बीएसएनएल कंपनीच्या बंद झालेल्या टेलिफोनचे डिपॉझिट वर्ष ते दीड वर्षात परत मिळत नाही अशी तक्रार केली. त्याचप्रमाणे राजेंद्र सुतार आणि सुनील वाघ यांनी वीज मंडळ बाबतीतील घरगुती ग्राहकांसाठी चा पहिला स्लॅब हा एक ते शंभर न ठेवता एक ते दोनशे ठेवावा अशी जोरदार मागणी केली.
याप्रसंगी धुळे ग्राहक जिल्हा न्यायालयाला माननीय नामदार अरुणजी देशपांडे जळगाव जिल्हा अध्यक्ष विकास महाजन सर आणि अंमळनेर ग्राहक पंचायतीचे शिष्टमंडळाने भेट दिली. यावेळी चाळीसगाव तालुका ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष रमेश सोनवणे सर हेही उपस्थित होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.