महाजन कृषी सेवा केंद्रात निंबाची रोपे मोफत उपलब्ध
इफको आणि महात्मा फुले शेतकरी विकास सह.संस्थेचा पर्यावरणपूरक उपक्रम,
अमळनेर-येथील धुळे रोडवरील महाजन कृषी सेवा केंद्र येथे कडुनिंबाच्या रोपांचे मोफत वितरण होत असून इफको आणि महात्मा फुले शेतकरी विकास सहकारी संस्थेच्या वतीने पर्यावरण पूरक परिस्थिती निर्माण होण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.
या उपक्रमास शहर व ग्रामिण भागातून देखील मोठा प्रतिसाद मिळत असून दररोज अनेक जण उस्फूर्तपणेपणे रोप घेऊन जात आहेत.गेल्या चार वर्षांपासून खानदेश सह संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असल्याने यातून मुक्ती मिळविण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण आणि संगोपन करणे ही काळाची गरज असून राज्यात सर्वत्र जोमाने वृक्षरोपन मोहीम राबविली जात आहे,शासन स्तरावरून देखील विविध माध्यमातून वृक्षारोपण सुरू असून नागरिक देखील यास प्रतिसाद देत आहे.या मोहिमेस अधिक चालना देण्यासाठी इफको आणि महात्मा फुले शेतकरी विकास सह संस्थेने पुढाकार घेतला असून तालुका स्तरावर निंबाची रोपे मोफत वाटप केली जात आहे.अमळनेर येथे विजय मारुती मंदिरा शेजारी असलेल्या महाजन कृषी सेवा केंद्रात ही रोपे उपलब्द असून जास्तीतजास्त नागरिकांनी ही रोपे घेऊन जाऊन आपल्या परिसरात आणि शेतात लावावीत अधिक माहितीसाठी प्रदीप महाजन 9765725240 यांचेशी संपर्क साधावा.