अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यस्मरण निमित्ताने मुख्याध्यापक संदीप पवार यांच्या हस्ते संत सावता महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तद्नंतर उपक्रमशील शिक्षक डी. ए. सोनवणे यांनी संत सावता महाराज यांच्या जीवनावर प्रकाशज्योत टाकताना विचार मंथनातून 'प्रपंच असुनी परमार्थ साधावा ,वाचे आठवावा पांडुरंग !
कांदा, मुळा भाजी अवघे विठाई माझी ! स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातोहात ! अशा विविध उदाहरणातून सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा घेण्यासाठी प्रउत्त केले. तसेच स्वातंत्र्यापूर्वी जालियनवाला बाग हत्याकांड करणारा इंग्रज अधिकारी जनरल डायर यांच्याविषयी शहीद उधमसिंग यांच्या मनात तीव्र असंतोष निर्माण होऊन त्यांनी इंग्लंड मध्ये जाऊन अमानुष कृत्ये करणाऱ्या जनरल डायरला गोळ्या घालून ठार केले. आणि इंग्लंड मध्येच हसत हसत फासावर जाऊन शहीद झाले . अशा थोर क्रांतिकारकाचीही माहिती कथन करून क्रांतीचे महत्त्व पटवून दिले . सदर कार्यक्रमास पी. एम. ठाकरे, व्ही. डी. पाटील, पी. ए. शेलकर, डी. एस. कारले, भारती चव्हाण मॅडम, धर्मेंद्र पाटील, सौरभ मेने आदी उपस्थित होते.