सयाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शांतीनिकेतन शाळेला फँन व विदयार्थांना शालोपयोगी वस्तु वाटप...
अमळनेर -प्रतिनिधी
येथील धनदाई एज्युकेशन सोसायटीचे सदस्य व शालेय समिती संचालक सयाजीराव वसंतराव पाटील यांनी सामाजिक दातृत्वाच्या भावनेने त्यांच्या वाढदिवसानिमित्त धनदाई एज्यू .सोसायटी संचलित शांतीनिकेतन प्राथमिक शाळेस प्रत्येक वर्गास फँन व गरजू विद्यार्थांना वह्या ,पेन चाँकलेट वाटप केले.
सामाजिक बांधिलकी जपणारे सयाजीराव पाटील उर्फ बबलू दादा हे बहुजन समाजातील कुठल्याही व्यक्तीच्या छोट्या मोठ्या सुख दुःखाच्या कार्यक्रमास हातभार लावण्यास अग्रेसर असतात.
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका निवेदिता कापडणेकर,यशवंत सुर्यंवंशी ,जयवंत पाटील ,योगेश शिरूडे, स्नेहल सिसोदे, सविता साळवे, के.के.पाटील,अजय भामरे ,शिवाजी मोरे ,स्वप्निल पाटील आदि शिक्षक उपस्थित होते.