अमळनेर प्रतिनिधी
अंचळगाव तांडा -येथील जिल्हा परिषद शाळेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री , धवल क्रांती आणि आणि हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त रेली काढण्यात आली.बालकांनी आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी त्यांच्या नावाचा जयघोष करीत परिसर दणाणून सोडला .कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष रविंद्र राठोड यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज आणि स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले .प्रास्ताविकात मुख्याध्यापक सुरेंद्र बोरसे यांनी वसंतराव नाईक यांच्या क्रुषि कार्याविषयी माहिती उपस्थितांना दिली . उपशिक्षक धनराज देवरे यांनी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जिवनकार्याविषयी माहिती दिली.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष रविंद्र राठोड , सदस्य पतीलाल राठोड , धर्मा पवार , तुळशीराम राठोड , कणीराम राठोड , रविंद्र चव्हाण , छोटू पवार, विकास पवार आदी उपस्थित होते .मुकेश चव्हाण , सागर राठोड , क्रुष्णा राठोड , तुळसा पवार , शीतल राठोड यां बालकांनी भाषणे दिली.सूत्रसंचालन धनराज देवरे आणि आभार सतिश पाटील यांनी मानले .