झारखंड राज्यातील तबरेज अन्सारी युवकच्या हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा दया.
मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशनचे उपविभागीय अधिकारीनां निवेदन.
अमळनेर प्रतिनिधी
मुस्लिम समाजाच्या वतीने तबरेज अन्सारी च्या आरोपींना फाशीची शिक्षा होणे व देशभरात अल्पसंख्यांक समाजावर होत असलेले अन्य थांबवणे बाबत प्रांतअधिकारी च्या मार्फत जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन मुस्लिम युथ सेवा फाउंडेशन व अल्पसंख्यांक विकास व हक्क फाउंडेशन च्या मुख्य कार्यकर्तांचे उपस्थिती देण्यात आले
झारखंड राज्यातील तबरेज अन्सारी युवक च्या हत्या करणारे आरोपींना कडक व सक्तीची कारवाई अथवा फाशी ची शिक्षा होवावी असे निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की भारत भरात मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर होत असलेले अन्याय तात्काळ थांबवावे, आणि झारखंड येथील तबरेज अन्सारी च्या आरोपींनवर कडक कारवाई करण्यात यावी आथवा फाशी ची शिक्षा व्हावी,
सध्याच झारखंड मध्ये तबरेज अन्सारी नावाच्या युवकाला चोरीच्या संशयात जमावाने खांबाला बांधुन बेदम मारहाण करत •••••••व •••••••• नारे लावण्यास भाग पाडले व मारहाण करत जखमी अवस्थेत सोडून दिले पोलीसांनी त्याला उपचारासाठी रूगणलयात नेण्या ऐवजी त्याला पोलीस ठाण्यात आले त्याचा उपचारात उशीर झाल्याने अखेर त्या युवकाचा मृत्यू झाला त्या युवकाला त्याची पत्नी व्यतिरिक्त कोणत्याही नातेवाईक नसून तो अनाथ होता त्याच प्रकारे त्याचा पत्नी सुध्दा अनाथ होती तीला फक्त तिच्या नवर्याचाच आधार होता तरि तबरेज अन्सारी च्या पत्नीला सरकारी नौकरी उपलब्ध करून देण्यात यावी आणि पंचवीस लाखांची रोख मदत मिळावी संपूर्ण भारतात होत असलेल्या माँ ब्लीचिंग घटना तात्काळ थांबवावे व सदरील घटनेच्या आरोपींना कठोर व कडक सक्तीची कारवाई करण्याची मागणी केली आहे
निवेदनावर मुस्लिम युथ सेवा फाउंडेशन चे जाकिर शेख, शराफत अली सैय्यद, रहिम मिस्तरी ,कुदरत अली, नविद शेख, अखतर अली, सुल्तान पठान ,वसीम खा, जाकिर मेवाती ,हाजी कमर अली,एड शकिल काझी, नगर सेवक फिरोज मिस्तरी,शारुख शेख व अल्पसंख्यांक विकास हक्क फाउंडेशन च्या अजहर अली सैयद, जुबेरखान पठान, सलमान शेख, अलतमश शेख, शहबाज शेख ,नाविद शेख, सह आदि बांधव समेत अनेक स्वक्षरी आहेत,