Halloween party ideas 2015


कपिलेश्वर मंदिरातील वेध पाठशाळेत बालकांची संपूर्ण आरोग्य तपासणी

आ.स्मिता वाघ यांचा आरोग्यदायी उपक्रम


अमळनेर प्रतिनिधी
  येथील आ.सौ स्मिता उदय वाघ यांच्या आरोग्य सेवेच्या उपक्रमांतर्गत कपिलेश्वर मंदिर येथे असलेल्या वेध पाठशाळेत बालकांची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत संपूर्ण वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
            आ.स्मिता वाघ यांचे आरोग्य दूत शिवाजी राजपूत यांनी सदरचे नियोजन केले.मारवड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुख सौ सुरेखा हिरवडे यांच्या नेतृत्वात श्रीमती एस एल ठाकरे,डी जी पाटील,युवराज पाटील,वाहनचालक इयाम साळुंखे,के एस बडगुजर,आदींसह आशा स्वयंसेवीका श्रीमती अरुणा चौधरी,व वंदना पवार यांच्या पथकाने सर्व बालकांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार देखील केले.सदर शिबिरात इतर रुग्णांची देखील तपासणी करण्यात आली.या शिबिराबद्दल कपिलेश्वर संस्थांनचे मठाधिपती श्री महामंडलेश्वर  हंसानंदजी महाराज यांनी समाधान व्यक्त करत आ स्मिता वाघ,आरोग्य दूत शिवाजी राजपूत,व वैद्यकीय अधिकारी आणि पथकाचे आभार मानले.
           दरम्यान आ स्मिता वाघ यानीं अमळनेर मतदार संघात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू केलेल्या आरोग्य सेवेमुळे शेकडो रुग्णांना जीवदान मिळाले असून शिबिरांच्या माध्यमातून अनेकांच्या व्याधी व आजार दूर होत आहे,यामुळे सदर उपक्रमाचे कौतुक होत आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.