जंबो किड्सच्या चिमुकल्यांची पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलीसदादांशी केली मैत्री.
अमळनेर प्रतिनिधी
आज दिनांक 17/07/2019 रोजी पोदार जंबो किड्स च्या चिमुकल्यानी अमळनेर पोलीस स्टेशन ला भेट देऊन पोलीस आपले चांगले मित्र असू शकतात तसेच दैनंदिन जीवनात त्यांची अडीअडचणीच्या वेळेस मदत होऊ शकते तसेच सर्व बालगोपालांच्या मनातील अवाजवी भीती दूर करून तेथील कार्याची माहिती घेत पोलीस स्टेशन भेटीचा आनंद साजरा करत चिमुकले परतले या सर्व उपक्रमात पोलीस स्टेशन प्रमुख साहेब तसेच सर्व स्टाफ चे अनमोल असे सहकार्य लाभले ट्रिप यशस्वीते साठी श्री प्रशांत कुडे, सौ निलिमा कुडे मॅम, स्वप्ना लाले मॅम, नूतन शिंदे मॅम, सौ जयश्री पाटील, सौ सुनीता पाटील यांचे सहकार्य लाभले...