Halloween party ideas 2015


अमळनेर येथील इंदिरा गांधी विद्यामंदिर शाळेत

! चांद्र विजयाची पन्नाशी साजरी !

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर येथील इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आधुनिक युगातील मानव जातीने केलेल्या गरुड झेपेला अर्थात चांद्र मोहिमेला आज रोजी पन्नास वर्षे पूर्ण  झाल्यामुळे  शालेय विद्यार्थ्यांना प्रोजेक्टवर चांद्र मोहिमेची सविस्तर माहिती दाखवण्यात आली . त्यात चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे चांद्रवीर नील आर्मस्ट्राँग आणि एडविन  तसेच आतापर्यंत चंद्रावर पाऊल ठेवणारे कोण कोण चांद्रवीर  आहेत त्यांची माहितीही देण्यात आली.  तसेच आतापर्यंत चंद्रावर कोणकोणत्या देशांनी मोहीम फत्ते केली आहे  ! आणि  चंद्रावर कोणाचा मालकी हक्क किंवा संयुक्त राष्ट्रसंघाने केलेल्या कामगिरीचा आणि कराराची माहितीही देण्यात आली . सदरच्या कार्यक्रमासाठी  महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळ आणि मुंदडा फाउंडेशनचे विद्यमान चिटणीस नरेंद्रभाऊ मुंदडा उपस्थित होते . त्यांनी आपल्या मनोगतात शालेय विध्यार्यांना प्रोजेक्टरचा वापर  कशा प्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी होत असतो याचे महत्त्व पटवून दिले . सदर कार्यक्रमाचे आयोजन उपक्रशील शिक्षक डी . ए. सोनवणे यांनी केले होते . तंत्रनिर्देशक म्हणून व्ही .डी. पाटील यांनी कामकाज पाहिले . सदर कार्यक्रमास मुख्याध्यापक संदीप पवार, पी. ए. शेलकर , पी. एम. ठाकरे, डी एस. कारले,  रविंद्र चौधरी आदी उपस्थित होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.