गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सत्कार
अमळनेर(प्रतिनिधी)तालुक्यातील आदर्शगांव देवगांव देवळी येथे ३१/०७/२०१९,वार-बुधवार रोजी,श्री.संत शिरोमणी सावता माळी पुण्यतिथी निमित्त युवकांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.त्यात सकाळी 9 वाजता गावातील सर्व स्तरावरील १०वी,१२वी,पदवीधर,डिप्लोमा विशेष प्राविण्यसह यश संपादन केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा भव्य गुणगौरव सोहळ्याचे आयोजन क्रांतीसुर्य महात्मा फुले विचार मंच व महाराष्ट्र माळी समाज महासंघ शाखा देवळी यांच्या संयुक्त विद्यमाने केले आहे तसेच सकाळी 11वाजता महाप्रसाद,संध्याकाळी-4 वाजता भव्यदिव्य पालखी सोहळा हनुमान मंदिरापासून संपूर्ण गावातून आशापुरी मंदिरापर्यत होईल व नंतर रात्री शिव चरित्रकार,ह.भ.प.वासुदेव महाराज आर्वीकर यांचे दणदणीत असा कीर्तनाच्या कार्यक्रम आशापुरी मंदिरावर होईल तसेच गुणगौरव सोहळासाठी विद्यार्थ्यानीं आपले मार्कशिट ची झेरॉक्स मोबाईल नंबर सह शिवाजी महाजन,गोपाल सुदाम माळी,रवींद्र चंद्रभान माळी,प्रमोद माळी, एकनाथ महाजन भटू माळी देवळी यांच्याकडे लवकर दिनांक-२६/७/२०१९पर्यत जमा करावे.व गावातील संपूर्ण नागरिकांनी श्री.संत सावता माळी पुण्यतिथी मध्ये मोठ्या संख्येने सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहेत