नंदुरबार प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील श्रीमती छाया जैन प्राथमिक शाळेत पुणे येथील युवकमित्र परिवार मार्फत 'बालवाचनालय'चे उदघाटन करण्यात आले.उदघाटक म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.बी.टी. अहिरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून व्ही.आर.चव्हाण हे होते.
राज्यात वाचन चळवळ वृद्धिंगत करणाऱ्या युवकमित्र परिवाराच्या प्रवीण महाजन यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तब्बल 200 बालवाचनाची पुस्तके उपलब्ध करून दिली होती. त्या प्रसंगी प्रमुख अतिथीच्या साहाय्याने पुस्तके वाटप करण्यात आली.विद्यार्थ्यांनी वाचनाचा छंद जोपासला तर चांगले उत्तम संस्कार वाचनकलेतून घडून येतात असे श्री.अहिरे यांनी सांगितले.सदर शाळा ही विनाअनुदानित असून नवापूर चौफुली परिसरातील झोपटपट्टीतील मुलामुलीनां मोफत शिक्षण देण्याचे कार्य करते.यावेळी सुत्रसंचालन श्रीमती अपेक्षा चव्हाण यांनी केले तर आभार मुख्यध्यापिका मनीषा पांडे यांनी मानले.यावेळी असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.