वारकरी संप्रदायातील महान संत अशी ओळख असणाऱ्या संत शिरोमणी सावता माळी महाराज यांची आज 724 वी पुण्यतिथी तेव्हा महाराजांना अभिवादन करताना सामाजिक युवा कार्यकर्त्या सपना माळी
महात्मा फुले मंडळ पुणे यांच्या वतीने संत सावतामाळी पुण्यतिथी उत्साहात साजरी
पुणे प्रतिनिधी- संत सावता माळी हे वारकरी संप्रदायातील एक संत होते सावता माळी यांनी कर्म हीच आपली भक्ती म्हणून आपल्या जीवनात कार्याला महत्त्व दिले त्यातूनच त्यांना पुढे विठ्ठलाचे दर्शन घडले संत सावतामाळी यांचे विचार आजच्या पिढीला प्रेरणादायी आहेत असे महात्मा फुले मंडळाच्या युवा सामाजिक कार्यकर्त्या सपना माळी यांनी सांगितले.
संत सावता माळी भवन, बुधवार पेठ, पुणे येथे महात्मा फुले मंडळ यांच्या वतीने महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला, सकाळी संत सावता माळी महाराज यांची पुजा-आरती करुन अभिवादन करण्यात आले त्यानंतर भजनी मंडळ भजनातून जीवनाचा सार सांगत अतिउत्साहाने कार्यक्रम पार पडला, त्यानंतर मान्यवरांचे सत्कार समारंभ मनोगत पार पडले, त्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम सहभोजन व परत भजन असा एकंदर कार्यक्रमाचा आढावा...*
*तेव्हा महात्मा फुले महामंडळाचे अध्यक्ष मधुकर राऊत व सामाजिक युवा कार्यकर्त्या सपना माळी, युवा माळी संघटनेच्या अध्यक्षा सुनिता भगत, सचिव वृषाली शिंदे आदी अभिवादन करतानाचे छायाचित्रे
तसेच सामाजिक युवा कार्यकर्त्या सपना माळी यांचा सत्कार करताना मंडळाचे अध्यक्ष मधुकर राऊत सर